Dhag (ढग)
‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर त्रिधारेतील शेवटची कादंबरी. ‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत... अशा आत्मशोधक जाणिवांचा प्रवास हे ह्या त्रिधारेचं वैशिष्ट्य आहे. ‘मी कोण ?’ हा ‘ढग’चा काळीजप्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे निनाद काही माणसांच्या मनात कायम गुंजत असतात. पण जगण्याच्या झटापटीत त्याकडे दुर्लक्ष होतं. ढग ह्याच आद्य प्रश्नाशी झुंज देते. ती घेताना आठवणीचा पासवर्ड वापरून ती भूतकाळाच्या गुहेचं दार उघडते.