-
Ashi Vadhate Smaranshakti (अशी वाढते स्मरणशक्ती)
तंत्रज्ञानामुळे गुणाकार, भागाकार असोत अथवा एखादा संदर्भ असो, आपल्याला एका क्लिकवर मिळतो. एखादी गोष्ट आठवण्याची वेळ आली तर चटकन काहीही आठवत नाही, अशी स्थिती बनली आहे. मात्र, परीक्षा, स्पर्धा आदींमधील यश स्मरणशक्तीवरच अवलंबून असते. त्या दृष्टीने वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांनी या पुस्तकात स्मरणशक्ती कशी वाढवावी, याचा कानमंत्र दिला आहे. केवळ विद्यार्थीच नव्हेत, तर सर्वांसाठीच ते उपयुक्त ठरावे. माणूस विसरतो कशामुळे, कशामुळे, या प्रश्नाचे उत्तर प्रारंभी त्या सांगतात. लक्षात का राहते, यावरही चर्चा करतात. स्मरणशक्तीचे शत्रू कोणते आणि स्मरणशक्तीचे मित्र कोणते याचा विचार करून अभ्यास म्हणजे काय, अभ्यासाची सुरुवात कशी करावी हे सांगून स्मरणशक्तीसाठी औषधे व उपचारांची माहिती त्या देतात. स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचे खेळ हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.