-
Mirza Galib (मिर्झा गालिब)
मी नेहमी म्हणतो की गालिबचे तीन सेवक होते . तिघ त्यांच्याबरोबर सदैव राहिले . एक होते कल्लू गालिबना त्यांनी अखेरपर्यत साथ दिली . दुसरी सेवक म्हणजे वफादार . बोबडं बोलायची ती . आणि तिसरा सेवक मी . ते दोघे वयाच्या गणिताप्रमाणे सुटले आजपावेतो गालिबच्या नोकरीत आहे . गालिबमध्ये एक 'डाऊन टू अर्थ' वृत्ती दिसते एक सर्वसाधारण माणूस राहतोय गालिबमध्ये तो आपल्याला गालिबशी जोडून टाकतो . मग आपण स्वत:ला गालिबशी आयडेंटीफाय करू शकतो. किवा आपल्याला तसं वाटत . आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगावर गालिबकडे एक quotation आहे . मी गालिबच्या घरी राहतोय असं अनेकदा वाटत.
-
Ekach Mulgi (एकच मुलगी)
पंडित जवाहरलाल नेहरू, बिल क्लिटेन, शरद पवार, गुलजार, निळू फुले, बेगम परविन सुलतान, सुलोचना, मृणाल गोरे, रिमा, आरती अंकलीकर-टिकेकर, नीलम गो-हे, सदा कर्हाडे, राझिया पटेल, ना. सं. इनामदार, अरुण शेवते या सर्वांना एकच मुलगी आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणजे मुलगा हवा ही सनातन परंपरा त्यांनी नाकारली आहे. मुलीला वाधावाताना किती सजन आणि सृजनशील असेल पाहिजे हे या पुस्तकातून वाचायला मिळते. एकविसाव्या शतकात स्त्री भ्रूणहत्येच्या बातम्यांनी मन अस्वस्थ होते. अशावेळी या मोठ्या माणसांनी समाजापुधे आदर्श ठेवला आहे. तुम्ही सुद्धा स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात आवाज उठावा. लेक वाच वा. समाज निरोगी बनवा.
-
Devdi (देवडी)
किताबों से कभी गुजरो तो यूँ किरदार मिलते हैं गए वक्तों की ड्योढ़ी में खड़े कुछ यार मिलते हैं !! आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. काही कायम सोबत राहतात, काही एखाद्या वळणावर साथ सोडून जातात. अशीच काही माणसे आपल्याला पुस्तकांमधूनही भेटतात. अनेक कथा, कादंबर्या, कवितांमधून भेटलेली पात्रे मनात कायम रुंजी घालतात. अशीच काही नवीन पात्रे आपल्या भेटीस आली आहेत गुलजार यांच्या देवडी या नव्या कथासंग्रहामधून.