-
Samrat Ashokcharitra (सम्राट अशोकचरित्र)
सुमारे अडीचहजार वर्षापूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउद्य स्थान असलेला असा 'सम्राट अशोक' नावाचा राजा होऊन गेला. त्याने केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले नाही तर येथील जनतेला धर्मज्ञान, सदाचार व भूतदया याची शिकवण दिली, प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला. अशा महान प्रियदर्शी राजाच्या चरित्रासंबंधी फारसे संदर्भ उपलब्ध होत नाहीत. शंभर वर्षापूर्वी तसे प्रयत्न झाले. काळाच्या ओघात संशोधनात अनेक संदर्भ मिळत गेले व ते आजही मिळत आहेत. कदाचित यापुढेही मिळतील. व संशोधनास नवीन विषय मिळत राहील यात शंका नाही. 'सम्राट अशोकाचे' चरित्र त्याने लिहिलेल्या स्तंभ- लेखाद्वारेच मिळते. श्री. वागो. आपटे यांनी मराठीतून चरित्र लिहून ७५ वर्ष लोटली. त्यानंतर असे मराठीत चरित्र प्रकाशित झाले नाही. मधल्या काळात झालेल्या संशोधनाचा आधार घेऊन श्री.प्र.रा. आहिरराव यांनी हे चरित्र परिपूर्ण (विकसित) केले आहे. अनेक नवीन संदर्भ, विचार व विषय घेतले आहेत, ते उपलब्ध झालेली छायाचित्रे व अशोकाच्या शिल्पांचे परिश्रमपूर्वक संपादन करून या चरित्रात दिले आहे. या महान सम्राटाचे पुनस्मरण करण्यास हातभार लावला आहे. मराठी वाङ्ममयातील एक उणीव या ग्रंथरूपाने भरून काढली आहे.
-
Aamchya Aayushyateel Kahee Aathwanee (आमच्या आयु
'रमाबाई रानडे' म्हणजेच न्यायमूर्ती रानडे यांच्या ज्या फक्त पत्नीच नव्हत्या तर ज्या त्यांच्या छाया होत्या, अशा एका महाराष्ट्रीय स्त्रीने स्वतंत्रपणे लिहिलेलं पहिलेच असं आत्मचरित्र म्हणजेच 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी'. रमाबाई रानडे ह्यांचे व्यक्तिमत्व किती प्रभावी होते ते हे आत्मचरित्र वाचताना लक्षात येते. वेळोवेळी घडलेल्या गोष्टी व झालेली संभाषणे काही सहज तर, काही विशेष कारणांनी ध्यानात राहिली ती आठवली तशी सध्याचे स्थितीत अंतःकरणाचे सांत्वन करण्यासाठी व जो श्रेष्ठतम सहवास जो आता प्रत्यक्ष राहिला नाही; त्याचा मानसिक रीतीने अनुभव घेण्यासाठी वहिनीबाईंनी कागदावर मांडली व आता ती वाचकांस सादर केली आहेत. अनुपमेय भक्ती व निस्सीम प्रेम या भावांनी या 'आठवणी' लिहिल्या आहेत त्या सहानुभूतीपूर्ण अंतःकरणांनी वाचक वाचतील हि आशा आहे. सध्याची सुप्रसिद्ध टी.व्ही. मालिका "उंच माझा झोका... " जशी प्रेक्षकांना आवडली तसेच प्रत्येक वाचकाला हे आत्मचरित्र नक्कीच आवडेल.