-
Man Hunt (मॅन हंट)
ओसामा बिन लादेन आणि अलकायदाने अमिरिकेविरुद्द्ध युद्ध पुकारल्या नंतर अमिरकेच्या प्रत्यक्ष धरतीवर झालेला पहिला दहशत हल्ला म्हणजे ९/११! या हल्ल्याने अमेरिकी नागरिकांच्या मनात असु रक्षिततेची भावना निर्माण केली आणि प्रशासन, लष्करी यंत्रणा आणि गुप्तचर संस्था यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उप स्थित केला. त्यामुळे 'बिन लादेनचा खातमा त्यानंतर अमेरिकेच्या अस्मितेचा प्रश्न बनला. तरीसुद्धा तब्बल १० वर्ष अमेरिकच्या तमाम अत्याधुनिक आणि अद्यावत यंत्रणेला गुंगारा देण्यात ओसामा बिन लादेन यशस्वी ठरला. त्यामुळे त्याच्या शोध मोहिमेची ही कथा ल क्षवेधी आणि थरारक ठरते!
-
Maharashtratil Vakte (महाराष्ट्रातील वक्ते)
महाराष्ट्राची पवित्रभूमी ही येथील संतमहात्म्यांमुळे जशी अधिक पावन झाली तशीच महाराष्ट्रातील सरस्वतीपुत्रांच्या वाग् विलासामुळे अधिकच चैतन्यमय झाली. महाराष्ट्रातील या सरस्वतीपुत्रांच्या आशिर्वादाने अनेक वाक् पटू महाराष्ट्राला लाभले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने अनेक व्यासपीठे त्यांनी गाजवली. त्या बँ. नाथ पै. श्री. म. माटे, सेतू महादेवराव पगडी, पु. ल. देशपांडे ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारख्या दिग्गज वक्त्यांचा परिचय महाराष्ट्रातील वाचकांना व्हावा या उद्देशाने झालेली ग्रंथनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्रातील वक्ते'.