-
Krishndwaipaayan Maharshi Vedvyas (कृष्णव्दैपायन म
Krishndwaipaayan Maharshi Vedvyas (कृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास)
-
-
Don Mhatare Ani Itar Katha (दोन म्हातारे आणि इतर क
धारवाड-हुबळी-हरिहर-गदग अशा उत्तर-मध्य कर्नाटकातील परिसरात या कथा घडतात. या भागातील निसर्ग आणि संस्कृती कवेत घेतानाच या कथेतील पात्र इथल्या माणसांची मानसिकता आणि श्रद्धा उराशी कवटाळून वावरताना दिसतात. कर्नाटक साहित्य अकादमी विजेते कथालेखक श्री. माधव कुलकर्णी समाजातील विविध स्तरांचे चित्रण करताना इथल्या सांस्कृतिक समृद्धीचाही दर्शन घडवतात. इथल्या जीवनाचे सत्य रंगवताना त्यातील कलात्मकतेला आणि चित्रमयतेलाही तितकेच प्राधान्य घेताना दिसतात. अनुवादित कथांचे दालन समृद्ध करणाऱ्या या कथा उमा वि. कुलकर्णी यांच्या ओघवत्या शैलीत.
-
Aashapurnadevinchya Nivdak Katha (आशापूर्णादेवींच
आशापूर्णादेवींच्या प्रचंड कथा भांडारातून निवडलेल्या या निवडक कथांचा संग्रह . सामान्य माणसाच्या भोवतीच नेहमी आशापूर्णादेवींच्या कथा विषय असतो . सर्वसामन्यांचे जीवन ,भावाभावांना , नातीगोती ,हे सारे त्यात सहजतेने येते . ' साध्याही विषयात किती आशय मोठे सापडे ' अगदी या अर्थाचेच त्यांचे लेखन नव्या जुन्या कथांचा हा संग्रह वाचक नक्कीच स्वीकारतील.
-
Aakalan Ani Aakshep (आकलन आणि आक्षेप)
साहित्यकृतीचे आकलन सामाजिक-सांस्कृतिक संदर्भाशिवाय होऊ शकत नाही आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण समजून घेतल्याशिवाय साहित्यकृतींचे मूल्यमापन होऊ शकत नाही,हे भान 'आकलन आणि आक्षेप' या पुस्तकातील सर्वच लेखांमध्ये आढळते. साहित्य हे समाजजीवनाला वळण लावणारी शक्ती असते,आणि साहित्य हि सामाजिक जीवनव्यवहाराची निष्पतीही असते.साहित्य सामाजिक कारणांचा परिणाम असते. आणि साहित्य हेच सामाजिक परिणामांचे कारणही असते. साहित्य हे सामाजिक अंतःस्वत्वांचे निर्देशकही असते. समाजाच्या विचाराने आणि प्रेरणांतून साहित्य निर्माण होते;समाजाला विचार आणि प्रेरणा साहित्य देतही असते. साहित्य आणि समाज यांच्यातील अनुबंधाचा जेव्हा साहित्यकृतीला विसर पडतो,तेव्हा पोटतिडीकीने आक्षेप नोंदविण्याचे कार्य या पुस्तकातील लेखनातून केले गेले. सांस्कृतिक संदर्भाची वीण सूक्ष्मपणे उकलून, आशयद्रव्य तळामुळातून ढवळून काढून आकलनाचे प्रश्न सोडवणे आणि निःपक्षपणे व तर्कशुद्धपणे मूल्यमापन करून धीटपणे आक्षेप नोंदविणे हे या पुस्तकातील लेखनाचे सामर्थ्य होय.
-
Just Relax (जस्ट रिलॅक्स)
शारीरिक आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी लेखकांनी या ग्रंथात सूक्ष्मतिसूक्ष्म समतोल टिप्स दिल्या आहेत.वाचकांना या तणावातून मुक्ती मिळविण्याकरिता या टिप्स जास्तीत जास्त फायदेशीर ठरू शकतील असा विश्वास वाटतो.