-
Nishpap-Ek Yuddhakatha (निःष्पाप-एक युद्धकथा)
किरणोत्सारी पदार्थामधून ज्याप्रमाणे सतत किरणोत्सर्ग होत राहतो .त्याप्रमानेच मानवी विचारांमधून चांगल्या -वाईट विचारांचा नेहमी उगम होतच राहतो .वैत विचार ज्यावेळी व्यापक प्रमाणात एकत्रित होण्यास सुरुवात होते ,त्यामधूनच कोणी हिटलर जन्म घेतो . जगाचा महाविनाश कोणत्या नैसर्गिक आपतीने होऊ दे किंवा नाही मनुष्याच्या हातातून मात्र हा विनाश नक्की होईलच. हा विनाश टाळण्यासाठी एका शक्तीशाली अतिरेकी वाईट प्रवृतीविरुध्द एक ' योद्धा ' उभा ठाकतो..... अशाच एका ' योध्दया ' ची संघर्ष कथा .
-
Raktadhruv (रक्तध्रुव)
विषयवासनेतून निर्माण झालेली परिस्थिती वणव्याचे रूप घेते आणि या वणव्यात पोटाच्या आगीपेक्षा भयंकर असलेली शरीराची आगच धगधगत राहते.वाचकाला खेचून नेणारी शैली व बांधेसूद रचना हे या कादंबरीचे मुख्य वैशिट्य.
-
Chandrotsav (चंद्रोत्सव)
हातातून निसटून गेलेल्या सुखाच्या शोधात निघालेल्या माणसांच्या मन विषण्ण करणार्या कथा .... या सगळ्या कथांमध्ये सामाजिक जाणीव, मानसोपचार आणि मुलीचं नातं, मुलीला आईविषयी वाटणारं एकटेपण आपण फार सुरेख शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे. मुलंबाळं एकदा बाहेर गेली आणि घरात एकटी स्त्री व एकटा पुरुष असला की त्यांचं अंतर्मन सतत त्यांना खात असतं, याचं सुरेख वर्णन दाखविलं आहे. त्याचबरोबर मुलगी हर्षदा आणि सुरिंदर यांचा आंतरजातीय प्रेमविवाह, त्यांचं संभाषण, त्यांचं वागणं याचंही फार सुरेख वर्णन झालं आहे.
-
Yugpravartak Vivekanand (युगप्रवर्तक विवेकानंद)
बालवयापासून असामन्य प्रतिभा असलेल्या नरेंद्राला अनेक प्रश्न पडत. त्यांची उत्तरे मिळाल्यावरच त्याला स्वस्थता लाभत असते. पण कोणी ईश्वर पहिला आहे का, हा त्याचा प्रश्न त्याला गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यापरेंत घेऊन गेला आणि त्यानंतर नरेंद्रचे रुपांतर एक साधक, सन्यासी, रूपसंपन्न, ज्ञानसंपन्न योगीपुरुष स्वामी विवेकानंदमध्ये झाले.जीवनातील उण्यापुऱ्या ३९ वर्षांमध्ये त्यांनी धर्म, राष्ट्र, संघटन या बाबतीत मोठे कार्य केले. त्यांच्या नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, विचार, मानव जातीबद्दलची सद्भावना या व अन्य पैलूंचे दर्शन शुभांगी भडभडे यांच्या 'युगप्रवर्तक विवेकानंद' मधून होते. नरेंद्र दत्त ते स्वामी विवेकानंद या सामन्यातून असामान्यतेकडे झालेला प्रवास यातून उलगडतो. त्यांचे विचार समाजसेवक, शासक, विद्वान, विचारवंत, अभ्यासक वा प्रामुख्याने तरुण पिढीसाठी उपयुक्त आहेत. युगनिर्माता, युगप्रवर्तक विवेकानंद समजून घेतले की भारताची खरी ओळख होते, याचा प्रत्यय ही कादंबरी वाचून येतो..
-
Born In The Garbage (बॉर्न इन द गारबेज)
'बॉर्न इन द गारबेज' हा प्रा. सावन धर्मपुरीवार यांचा नऊ मर्मभेदी कथांचा संग्रह आकाराने लहान असला,तरी आशय व अभिव्यक्तीची उंची गाठणारा आहे.