-
Socretis Kadhi Marat Nasato (सॉक्रेटिस कधी मरत नसत
हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो. मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे. मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह….
-
Sakshep (साक्षेप)
डॉ. रवींद्र शोभणे यांचे समीक्षालेखन म्हणजे सगळ्यातून सर्जनशील लेखनाचा शोध घेण्याचा प्रयत्न होय. या सर्जनाच्या पाठीमागे काही घटक असतात. काही स्रोत असतात. अशा घटकांचा, स्रोतांचा शोध घेणे हे खरे तर सर्जनशील समीक्षकांचे काम असते. आणि समीक्षक हा जर मुळात सर्जनशील लेखक असेल तर तो त्या अंगाने समोर असलेल्या कलाकृतीचा असा शोध घेत असतो. अर्थात हा शोध म्हणजे अंतिम सत्य नसते, पण त्या सत्याच्या वाटेवरून जाण्याचा तो एक मार्ग ठरतो. हा मार्ग, हा प्रवास सर्जनशील समीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या भूमिकेतून डॉ. रवींद्र शोभणे यांनी केलेल्या या समीक्षालेखनच्या) निमित्ताने वाचकांना पुन्हा नव्याने त्या त्या कलाकृतीकडे, लेखकांकडे जाता येईल. वाचकांना मिळणाऱ्या या पुनः प्रत्ययाच्या आनंदातच या लेखनाचे यश आहे.
-
Pravah (प्रवाह)
प्रवाह' ही कादंबरी वाचकाला जगण्याच्या प्रवाहाशी जोडून घेते. ह्यावं मुख्य कारण ह्या प्रवाहातल्या लाटा, भारती-ओहटी, भोवरे, बादळं, श्वास कोंडणं, किनारा दिसणं, निसटणं, कधी आनंददायी डुंबणं, तर कधी स्वतःच्याच मस्तीत स्वार होणं, कधी खोल गर्तेत जाणं... अशा अनेक भावावस्था प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर एका वेगळ्या अर्थाने अनुभवायला वा पाहायला मिळतात. कादंबरी हा रूपबंध मानवी आयुष्याचा विशाल पट वाचकांसमोर उलगडत असतो. 'प्रवाह' कादंबरीचा हा पटफ्राईडच्या 'जगण्याच्या धडपडीकरिता कामवासनेचं सर्वव्यापी असणं, या सिद्धांताचा धागा आणि त्याचे अनेक रंग वाचकांसमोर आणतो. तारा ही व्यक्तिरेखा ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भावविश्वातले, तिचे आणि तिच्या आयुष्यातल्या इतरांचे, अनेक क्षणांचे घटितार्थ एक टोकदार, जळजळीत वास्तव उमं करतात. ताराच्या आणि इतर व्यक्तिरेखांच्या भावजीवनातले कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अशा सर्व पातळ्यांवरचे प्रश्न दुर्देवाने अनुत्तरीतच राहतात. तथाकथित सांकेतिक, संयमित, सुसंस्कृत प्रतीकांचं आशयाला अवगुंठन न देता मानवी मनातल्या उल्या पालथींना ही कादंबरी अस्सल स्वरूपात व्यक्त करते. माणसाच्या जगण्याच्या प्रवाहात भूक आणि कामवासना ह्या आदिम प्रेरणा अपरिहार्य असल्याचं ती स्पष्टपणे सुचवते. जीवनाचं हे बिरूप दर्शन सुद्धा बाचकांना निश्चितच अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारं आहे.
-
Shahamrug (शहामृग)
प्रत्यक्षातल्या माणसाच असण आणि दिसण त्याच जगण आणि वागण त्याचे वासना विकार त्याचा हे सगळचं तर्कातीत असत. गोचरत्वाचा पलीकडच केवळ एवढावरच चिमटीत धरून माणसाच मोठेपणा वा श्रुद्रत्व दाखविता येत नाही ते तस ठरविता येत नाही. तर माणसाचा मुळापर्यंत पोहोचण्याचा या काही पायरा. केवळ चाचपडण्यापुरता. बेवरवशाच्या या चाचपडण्यातून काही हाती येत का ? कुठलं सत्य गवसत का? आणि हे सत्य तरी कुठल्या आधारवर सत्य म्हणून स्वीकारायचा? ललित लेखनाचा केंदीभूत माणसाचा शोधाची हि अखंड प्रक्रिया. प्रत्येक कलावंत आपापल्या कुवतीनुसार या प्रक्रियेचा एक भाग होतो. रवींद्र शोभने याच्या शहामृग मधील दीर्घकथांनी माणसाचा मुळापर्यंत पोहोचण्याचा केलेला हा प्रयल तटस्थ्. तरीही उत्कट आणि सयंत.
-
Raktadhruv (रक्तध्रुव)
विषयवासनेतून निर्माण झालेली परिस्थिती वणव्याचे रूप घेते आणि या वणव्यात पोटाच्या आगीपेक्षा भयंकर असलेली शरीराची आगच धगधगत राहते.वाचकाला खेचून नेणारी शैली व बांधेसूद रचना हे या कादंबरीचे मुख्य वैशिट्य.
-
Chandrotsav (चंद्रोत्सव)
हातातून निसटून गेलेल्या सुखाच्या शोधात निघालेल्या माणसांच्या मन विषण्ण करणार्या कथा .... या सगळ्या कथांमध्ये सामाजिक जाणीव, मानसोपचार आणि मुलीचं नातं, मुलीला आईविषयी वाटणारं एकटेपण आपण फार सुरेख शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे. मुलंबाळं एकदा बाहेर गेली आणि घरात एकटी स्त्री व एकटा पुरुष असला की त्यांचं अंतर्मन सतत त्यांना खात असतं, याचं सुरेख वर्णन दाखविलं आहे. त्याचबरोबर मुलगी हर्षदा आणि सुरिंदर यांचा आंतरजातीय प्रेमविवाह, त्यांचं संभाषण, त्यांचं वागणं याचंही फार सुरेख वर्णन झालं आहे.