Pravah (प्रवाह)
प्रवाह' ही कादंबरी वाचकाला जगण्याच्या प्रवाहाशी जोडून घेते. ह्यावं मुख्य कारण ह्या प्रवाहातल्या लाटा, भारती-ओहटी, भोवरे, बादळं, श्वास कोंडणं, किनारा दिसणं, निसटणं, कधी आनंददायी डुंबणं, तर कधी स्वतःच्याच मस्तीत स्वार होणं, कधी खोल गर्तेत जाणं... अशा अनेक भावावस्था प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर एका वेगळ्या अर्थाने अनुभवायला वा पाहायला मिळतात. कादंबरी हा रूपबंध मानवी आयुष्याचा विशाल पट वाचकांसमोर उलगडत असतो. 'प्रवाह' कादंबरीचा हा पटफ्राईडच्या 'जगण्याच्या धडपडीकरिता कामवासनेचं सर्वव्यापी असणं, या सिद्धांताचा धागा आणि त्याचे अनेक रंग वाचकांसमोर आणतो. तारा ही व्यक्तिरेखा ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भावविश्वातले, तिचे आणि तिच्या आयुष्यातल्या इतरांचे, अनेक क्षणांचे घटितार्थ एक टोकदार, जळजळीत वास्तव उमं करतात. ताराच्या आणि इतर व्यक्तिरेखांच्या भावजीवनातले कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अशा सर्व पातळ्यांवरचे प्रश्न दुर्देवाने अनुत्तरीतच राहतात. तथाकथित सांकेतिक, संयमित, सुसंस्कृत प्रतीकांचं आशयाला अवगुंठन न देता मानवी मनातल्या उल्या पालथींना ही कादंबरी अस्सल स्वरूपात व्यक्त करते. माणसाच्या जगण्याच्या प्रवाहात भूक आणि कामवासना ह्या आदिम प्रेरणा अपरिहार्य असल्याचं ती स्पष्टपणे सुचवते. जीवनाचं हे बिरूप दर्शन सुद्धा बाचकांना निश्चितच अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारं आहे.