Yugpravartak Vivekanand (युगप्रवर्तक विवेकानंद)
बालवयापासून असामन्य प्रतिभा असलेल्या नरेंद्राला अनेक प्रश्न पडत. त्यांची उत्तरे मिळाल्यावरच त्याला स्वस्थता लाभत असते. पण कोणी ईश्वर पहिला आहे का, हा त्याचा प्रश्न त्याला गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यापरेंत घेऊन गेला आणि त्यानंतर नरेंद्रचे रुपांतर एक साधक, सन्यासी, रूपसंपन्न, ज्ञानसंपन्न योगीपुरुष स्वामी विवेकानंदमध्ये झाले.जीवनातील उण्यापुऱ्या ३९ वर्षांमध्ये त्यांनी धर्म, राष्ट्र, संघटन या बाबतीत मोठे कार्य केले. त्यांच्या नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, विचार, मानव जातीबद्दलची सद्भावना या व अन्य पैलूंचे दर्शन शुभांगी भडभडे यांच्या 'युगप्रवर्तक विवेकानंद' मधून होते. नरेंद्र दत्त ते स्वामी विवेकानंद या सामन्यातून असामान्यतेकडे झालेला प्रवास यातून उलगडतो. त्यांचे विचार समाजसेवक, शासक, विद्वान, विचारवंत, अभ्यासक वा प्रामुख्याने तरुण पिढीसाठी उपयुक्त आहेत. युगनिर्माता, युगप्रवर्तक विवेकानंद समजून घेतले की भारताची खरी ओळख होते, याचा प्रत्यय ही कादंबरी वाचून येतो..