-
Shyamchi Aai
साने गुरुजींनी आपल्या लहानपणाच्या सात्विक भावनांचा क्रमश: कसा विकास होत गेला, हे मार्मिकपणे व अंत:करण हेलावून सोडतील अशा सहृदयतेने ह्या पुस्तकात वर्णन केले आहे. ‘‘श्यामची आई’’ हे पू. साने गुरुजींचे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी वाचले जाते. ह्या पुस्तकाचे वाचन करणे वा करवून घेणे हा एक सांस्कृतिक भाग झाला आहे. देवदिकांची स्तोत्रे आपण म्हणतो, आपल्या मुलांच्याकडून म्हणवून घेतो. त्याचप्रमाणे साने गुरुजींनी लिहिलेले ‘‘मातृप्रेमाचे स्तोत्र’’ घरोघरी वाचले जाते.