-
Delivering Happiness (डिलिव्हरिंग हॅपिनेस)
डिलिव्हरिंग हॅपिनेस हे पुस्तक आपल्याला, व्यावसायिक यशासोबतच लेखकाच्या आयुष्याचा प्रेरणादायक प्रवास पोहोचवते. अतिशय लहान वयातच व्यवसायाची ओढ निर्माण झालेल्या टोनीची ही कथा आपल्याला बरंच काही शिकवून जाते. लहानपणी मिस्किल, खट्याळ, डांबरट, उद्योगी; पण ध्येयवादी असणार्या टोनीने कुमारवयातच छोट्या छोट्या उद्योगांना सुरुवात केली. मित्राच्या सहकार्यानं त्यानं सुरुवातीला `लिंक एक्स्चेंज’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी आणि त्यानंतर इंटरनेटद्वारा बूट विकणारी ‘झापोस’ नावाची त्यांनी कंपनी सुरू केली. या कंपनीला नावारूपाला आणण्यासाठी त्यानं किती संकटं झेलली; धैर्यानं, जिद्दीनं तो कशा प्रकारे उभा राहिला; कंपनीला तारणारं मार्गदर्शक तत्त्व त्याला कसं उमगलं; इथपर्यंतचा टोनीचा प्रवास हा विलक्षण आहे. केवळ सदतीस वर्षांचा असणारा हा व्यावसायिक त्याच्या जीवनकहाणीतून अनेक मूल्यं आपल्यापर्यंत पोहोचवतो.
-
Mr and Mrs Jinnah (मिस्टर अँड मिसेस जिना)
आपल्या 35 वर्षांच्या पत्रकारितेच्या व्यवसायकाळात शीला रेड्डी यांनी भारतातील नामवंत दैनिकं आणि नियतकालिकं यासाठी लेखन केलं आहे. त्यांनी राजकारण, इतिहास, संस्कृती, साहित्य, चरित्र, देशाबाहेरील नामवंत आणि सुधारक स्त्री-पुरुषांच्या मुलाखतींबाबत विस्तृत लिखाण केलं आहे. मिस्टर अँड मिसेस जिना हे त्यांचं दुसरं पुस्तक आहे.
-
Return Of A King (रिटर्न ऑफ अ किंग )
शहाशुजा उल्-मुल्कला तरुण वयातच आजोबा अहमदशहा अब्दाली यांनी स्थापन केलेलं दुर्राणी साम्राज्य वारसाहक्कानं मिळालं. जगातला सर्वांत मोठा हिरा कोह-इ-नूर - कोहिनूर, (प्रकाशाचा पर्वत) आणि ‘फखाज’ (पुष्कराज!) नावाचं माणिक ही या घराण्यातली दोन अत्यंत मौल्यवान नाहीशी झालेली रत्नं शहाशुजाने विश्वासातल्या माणसांकरवी परत मिळवली. शहाशुजा हा उच्चविद्या विभूषित, हुशार, निश्चयी आणि अविचल वृत्तीचा आणि मित्रांशी असाधारण निष्ठेनं वागणारा होता. संपूर्ण आयुष्यात त्याला वारंवार गंभीर आपत्तींना सामोरं जावं लागलं; परंतु तो कधीही खचला नाही किंवा निराशही झाला नाही. त्याच्या संपूर्ण आयुष्यात आशावाद हेच त्याचं बलस्थान ठरलं. शुजाच्या अंगी अनेक दोष होते आणि त्यानं अनेकदा चुकीचे निर्णय घेतले; परंतु जेव्हा नोव्हेंबर १८४१ मध्ये बंड उसळून दाराशी संकट येऊन उभं राहिलं, तेव्हा कार्यक्षमतेनं त्याचा लष्करी प्रतिकार करणारा संपूर्ण काबूलमधला एकमेव माणूस फक्त शहाशुजा होता. ‘अकार्यक्षम ब्रिटिश आश्रयदात्यांच्या सेनेवर अवाजवी भिस्त टाकणं, ही त्याची सर्वांत मोठी चूक ठरली.’ शुजाचं खूपसं आयुष्य जसं अपयशाच्या छायेत व्यतीत झालं; त्याच पद्धतीनं त्याच्या वादळी आयुष्याची अखेर झाली.
-
Arise Awake (अराइज अवेक)
अराइज, अवेक हे तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त करणारं आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. विविध युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू केले. त्या व्यवसायाची संकल्पना त्यांना कशी सुचली, कल्पना सुचल्यावर त्यांनी काय केलं, भांडवल कसं उभं केलं, आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी केली, त्या व्यवसायाला लोकांचा (गिह्राईकांचा) कसा प्रतिसाद मिळाला, आपलं उत्पादन तयार करताना, त्याची जाहिरात करताना, तसेच आर्थिक बाबतीत किंवा अन्य स्वरूपाच्या त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याचं सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. कोणी डॉक्टरांसाठीचं सॉफ्टवेअर तयार केलं, तर कोणी सिमेंट काँक्रीटच्या विटा, कोणी पूजा किट्स तयार केली, तर कोणी टी शर्ट्स, कोणी कॅपचावर लक्ष केंद्रित केलं, तर कोणी कॉम्प्यूटर सायन्स शिकवण्यावर, अशा अनेक युवा उद्योजकांच्या या प्रेरणादायी कथा युवा वर्गाने आणि सगळ्यांनीच अवश्य वाचाव्या अशा आहेत.
-
Sudoul Raha (सुडौल राहा)
आहाराच्या सवयींबाबत तारतम्य बाळगणं म्हणजे तारेवरची कसरत. त्यात सामान्य माणसाला आहार घटकांची पुरेशी माहिती नसते. हे सामान्य ज्ञान सोप्या , सहज भाषेतून या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचतं. प्रथिने, कर्बोदकं आणि इतर आहार घटक, ते उपलब्ध असणारे पदार्थ आणि त्यांचा दैनंदिन आहारातील समावेश , या सर्व गोष्टींची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकातून समोर येते. पुजा मखिजा यांची सांगण्याची रीत या पुस्तकाची जमेची बाजू. माणसाच्या आहाराच्या सवयींविषयी बोलताना त्या अनेक गमंतीशीर संदर्भ देतात. या आहाराच्या सवयींना त्या माकडाची उपमा देतात. त्या म्हणतात, माकडासारखा आहार- म्हणजे एक खूळ संपलं की दुसरं खूळ डोक्यात घेणारा आहार. अकाई बेरीजपासून अॅगयपल सायडर व्हिनिगरकडे धाव घेणारा आहार. कोणतीही नवी, चकचकीत, आकर्षक गोष्ट पाहिली की, माकड त्यावर झडप घालतं, त्यातला काही भाग टाकून देतं आणि फक्त आवडीचा तेवढाच खातं, तसा हा आहार असतो. `मंकी डाएट` तुम्हाला `नव्या` अन्नपदार्थाबद्दल अर्धी कच्ची माहिती देतं आणि त्याचे फायदे अवास्तव वाढवून सांगतं. अशा डाएटमध्ये एकाच अन्नघटकाचा अतिरेक असतो.
-
Sad Uttungachi (साद उत्तुंगाची)
जीवावर उदार होऊन गिर्यारोहणाचा आनंद स्वतः लुटणाऱ्या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देणाऱ्या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण! साहस, महत्वाकांक्षा आणि जबरदस्त सहनशक्ती यांचं मूर्तीमंत प्रतिक असलेल्या स्कॉट फिशरच्या जीवनाचा आलेख वाचता- वाचता आपण त्याच्या समवेत जगभरातील विविध उत्तुंग, दुर्गम शिखरांवर फेरफटका करून येतो. आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक अनुभवात आपणसुद्धा समरसून जगतो. आयुष्यभर ज्या एव्हरेस्ट पर्वताचा त्याला ध्यास लागलेला होता,त्याच पर्वताच्या कुशीत विसावून अखेरचा श्वास घेणारा स्कॉट फिशर आपल्या हृदयाचा ठाव घेतो!
-
Swapnanche Indradhanu (स्वप्नांचे इंद्रधनू )
आव्हान स्वीकारण्याचं धाडस करणा-या २५ असाधारण स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आलेख म्हणजे हे पुस्तक. या स्त्रियांनी त्यांच्या कुटुंबाच आणि त्यांनी स्थापन केलेल्या उद्योगांच प्रेमानं लालनपालन केलं. हे काम त्यांनी मोठ्या प्रेमानं, हसत-खेळत आणि सहन शीलतेनं केलं. ना कधी हार मानली! या काहण्या एकच सत्य सांगत्ताहेत : स्त्रिया वेगळ्या प्रकारे विचार करतात; आणि वेगळ्या प्रकारे वागतात, परंतु त्या तेवढ्याच यशस्वी होऊ शकतात. या यशस्वी उदोयोजिकांच्या कहाण्या प्ररेक तर आहेतच. पण त्या तुमच्यात दडलेल्या उदयो जिकेलाही साद घालतात. इतकंच नव्हे, पुरुषांनाही काहीतरी करून दाखवण्याची उर्मी देतात.
-
Stones Into Schools (स्टोन्स इनटु स्कूल्स)
ग्रेग मॉर्टेन्सन. बेस्ट सेलर म्हणून जगभरात गाजत असलेल्या 'थ्री कप्स ऑफ टी' या पुस्तकाचा लेखक. हे पुस्तक पाकिस्तानमधील काराकोरम या अतिशय उंच व दुर्गम पर्वतराजीतील कोर्फे या गावात ग्रेगच्या 'सेंट्रल एशि[...]
-
Chicken Soup For The Sisters Soul
आपल्याला बहीण असणं आणि आपण कुणाची तरी बहीण असणं किती भाग्याचं आहे याचा साक्षात्कार घडवणार्या हृद्य कथा! ""ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते.'' ""तिच्याविना मी सौरभौर होईन!'' ""मी तिला काहीही सांगू शकते.'' ""मी तिच्याशी दिवसा-रात्री कधीही बोलू शकते.'' "चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल' मधल्या कथांमधून वारंवार येणारी ही वाक्यं खूपच बोलकी आहेत. हे पुस्तक म्हणजे ह्या अनोख्या नात्याची थोरवी मानण्याचा एक उत्सवच आहे! बहिणी असतात आपल्या अत्यंत मौल्यवान अनुभवांच्या खजिनदार. आपली सुख-दु:ख वाटून घेणार्या साक्षीदार. कुटुंबाच्या वाट््याला आलेले काळेकुट्ट क्षण जोडीनं भोगणार्या सख्या. आपल्याला सर्वाधिक ओळखणार्या आपल्या मौत्रिणी. विविध अनुभवांद्वारे या कोमल नात्याचे अनेक तलम पदर उलगडून दाखवणार्या ह्या प्रेरणादायी कथा आपल्या मनाच्या सहसंवेदनेची तार झंकारत ठेवतात!
-
Schapelle
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोनेशियात तिला वीस वष| कारावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सार्या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वी न्सलंडमये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सया केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हारता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही; कारण सया तरी ती 2024 पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही. शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधामागचं सत्य... प्रसारमायमांनी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत... ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या... या सवा|चं अत्यंत वस्तुनिष्ट, संयत वर्णन शॅपेल ह्या पुस्तकात शोध -पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे. टोनी विल्सन यांचा शॅपेलच्या निर्दोषत्वावर नेहमीच दृढविश्वास राहिला. आणि शॅपेलच्या हादरवून टाकणार्या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.
-
The Fakir
आत्महत्येकडे कल असलेला एक हिप्पी आणि अजब विनोदबुद्धी असलेला एक फकीर, असा प्रवास जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकेल.... जिथं देव आणि गुरूवास करतात, त्या तुमच्या अंतर्मनाला अर्पण केलेला, 'फकीर' हा श्वास रोखायला लावणारा, आत्म्याच्या साहसी मुशाफिरीचं रेखाटन करणारा 'अक्षर' नजराणा आहे. जिवंत असण्याचा आनंद अनुभवा, सोपं पण आयुष्य बदलून टाकणारं, सर्वांबद्दल दयाभाव राखण्याचं तत्त्वज्ञान शिका आणि बदलाकडचं पहिलं पाऊल उचलून स्वत:ला बरं करा. ही आहे एक चित्तवेधक कहाणी. कर्म, दैवी कृती, मृत्यूनंतरचं आयुष्य, आत्म्याचा आत्म्याशी संपर्क, प्रार्थनेतली शक्ती, श्रद्धा आणि क्षमा, ऊर्जा आणि बरं करणं, चांगुलपणात देवाचा शोध घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत गुरूशी सुसंवाद साधून राहाणं, यासारखे गहन प्रश्न, ती सोप्या, समजेल, उमजेल अशा पद्धतीनं हाताळते. 'द फकीर' फक्त तुम्हाला कसं जगायचं एवढंच शिकवत नाही... पण मरण कसं स्वीकारायचं तेही शिकवतं.