-
City Of Bones (सिटी ऑफ बोन्स)
हॉलिवूड हिल्समधे एका कुत्र्याला हाड मिळते आणि त्यामुळे वीस वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटते . तसे हे प्रकरण नेहमीसारखेच ,भावनाशून्य ,पण त्यामुळे डिटेक्टिव्ह हॅरी बॉशच्या लहानपणीच्या ,तो अनाथ असण्याच्या आठवणी जाग्या होतात . आपल्या तपासात बॉश भूतकाळात जातो खरा ,पण त्याचवेळी ,पोलिसदलात नव्याने दाखल झालेली सौंदर्यवती त्याला भानावर आणते. चौकशीकाळात हे प्रकरण अनेक धक्के देते . बॉशची त्यासाठी तयारी झालेली नसते. अचानक लॉस एंजलिस शहरात रान उठते आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी झगडणारा बॉश,कल्पनादेखील करता येणार नाही अशा निर्णयाप्रत येतो..
-
Shoe Dog ( शु डॉग )
संपूर्ण शरीराचा डोलारा ज्या पायांवर उभा असतो, त्या पायांची काळजी घेत; धावपटूंपासून ते सर्वसामान्यांच्या पसंतीला उतरेल असे विविध प्रयोग करत, लोकप्रिय ठरलेला ‘नाइके’ हा ब्रँड आणि त्याचा सर्वेसर्वा फिल नाइट यांची कथा म्हणजे ‘रौशनदानू डॉग’. या पुस्तकात नाइके कंपनीचा आत्मा आणि हृदय असलेले पायाभूत संबंध कसे निर्माण झाले आणि त्या परस्पर संबंधांतून सगळं जग बदलून टाकणार्या एका ब्रँडची आणि संस्कृतीची निर्मिती कशी झाली, या प्रवासाला त्याने यातून उजाळा दिला आहे. स्वूश हा आता एक साधासुधा लोगो राहिलेला नाही. स्वूश या लोगोमागे असणारा फिल नाइट नावाचा कर्ताधर्ता ही नेहमीच एक गूढता राहिली आहे; पण आता या आश्चर्यकारक, विनम्र, निर्भेळ, मिस्कील आणि सुंदररीत्या मांडलेल्या स्मृतिकथनात नाइटने हीच गूढता उलगडली आहे. ती सामान्य वाचकांबरोबरच युवा पिढीला, व्यावसायिकांनाही प्रेरणादायक ठरणारी आहे.
-
India In Slow Motion ( इंडिया इन स्लो मोशन )
तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्या बालकामगारांच्या प्रश्नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेला संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार, हैदराबादचे 'सायबराबाद' करण्याचा चन्द्राबाबू नायडू यांचा प्रयत्न, गुजराथमधील जलसंधारणाचे खाजगी स्तरावरील प्रयत्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, काश्मीरमधील खरी परिस्थिती अशा अनेक विषयांना मार्क टुली यांनी मर्मग्राही स्पर्श केलेला आहे. अनेक भारतीयांना अजूनही माहीत नसलेले असे एक वेगळे विश्व त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. या सर्वांतून 'सारे जहॉंसे अच्छा' असलेला आपला भारत देश अजून मागे का रेंगाळतो आहे, याचे उत्तर त्यांनी फार समर्पकपणे दिले आहे.
-
On Her Majesty's Secret Service
टप खाली घेतलेली लान्शिया स्पायडर गाडी त्याच्या शेजारून झपाट्याने पुढे गेली. त्याच्या गाडीच्या बॉनेटला ओझरता स्पर्श करून दूर जाऊ लागली आणि लान्शियाच्या दुहेरी एक्झॉस्ट पाइपमधून घुमणारा आवाज त्याच्या दिशेने येऊ लागला. केसांना भडक गुलाबी रंगाचा रुमाल बांधलेली एक मुलगी ती गाडी चालवत होती. जेम्स बाँडला उत्तेजित करणारी जगात एकच गोष्ट होती, ती म्हणजे एखाद्या सुंदर मुलीने त्याला मागे टाकणे. बाँड त्या सुंदर पण बिनधास्त मुलीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करतो आणि त्याचवेळी पृथ्वीवरील एका अत्यंत भयानक व्यक्तीच्या कारवायांचा त्याला सुगावा लागतो. ही व्यक्ती म्हणजे स्पेक्टर या अत्यंत घातक अशा संस्थेचा प्रमुख अन्स्र्ट स्टाव्हरो ब्लोफेल्ड. आल्प्स पर्वतावरील त्याच्या बर्फाच्छादित अशा गुप्त ठिकाणी सा-या जगाची सुरक्षितता धोक्यात येईल, असे काही प्रयोग ब्लोफेल्ड करत असतो. या अत्यंत बुद्धिमान परंतु खुनशी माणसाला नष्ट करायचं असेल, तर तिथे बाँडला स्वत: जाऊन महत्त्वाची माहिती गोळा करावी लागणार असते आणि तेही स्पेक्टरच्या माणसांच्या नजरेस न पडता. पण त्यासाठी अत्यंत वेगाने हालचाल करणा-या एखाद्या व्यक्तीची त्याला गरज भासणार होती... "प्रत्येक पुरुषाला आपण जेम्स बाँड व्हावं असं वाटतं आणि प्रत्येक स्त्रीला आपण त्याच्या अंथरुणात शिरावं असं वाटतं."