India In Slow Motion ( इंडिया इन स्लो मोशन )
तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्या बालकामगारांच्या प्रश्नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेला संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार, हैदराबादचे 'सायबराबाद' करण्याचा चन्द्राबाबू नायडू यांचा प्रयत्न, गुजराथमधील जलसंधारणाचे खाजगी स्तरावरील प्रयत्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, काश्मीरमधील खरी परिस्थिती अशा अनेक विषयांना मार्क टुली यांनी मर्मग्राही स्पर्श केलेला आहे. अनेक भारतीयांना अजूनही माहीत नसलेले असे एक वेगळे विश्व त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. या सर्वांतून 'सारे जहॉंसे अच्छा' असलेला आपला भारत देश अजून मागे का रेंगाळतो आहे, याचे उत्तर त्यांनी फार समर्पकपणे दिले आहे.