On Her Majesty's Secret Service
टप खाली घेतलेली लान्शिया स्पायडर गाडी त्याच्या शेजारून झपाट्याने पुढे गेली. त्याच्या गाडीच्या बॉनेटला ओझरता स्पर्श करून दूर जाऊ लागली आणि लान्शियाच्या दुहेरी एक्झॉस्ट पाइपमधून घुमणारा आवाज त्याच्या दिशेने येऊ लागला. केसांना भडक गुलाबी रंगाचा रुमाल बांधलेली एक मुलगी ती गाडी चालवत होती. जेम्स बाँडला उत्तेजित करणारी जगात एकच गोष्ट होती, ती म्हणजे एखाद्या सुंदर मुलीने त्याला मागे टाकणे. बाँड त्या सुंदर पण बिनधास्त मुलीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करतो आणि त्याचवेळी पृथ्वीवरील एका अत्यंत भयानक व्यक्तीच्या कारवायांचा त्याला सुगावा लागतो. ही व्यक्ती म्हणजे स्पेक्टर या अत्यंत घातक अशा संस्थेचा प्रमुख अन्स्र्ट स्टाव्हरो ब्लोफेल्ड. आल्प्स पर्वतावरील त्याच्या बर्फाच्छादित अशा गुप्त ठिकाणी सा-या जगाची सुरक्षितता धोक्यात येईल, असे काही प्रयोग ब्लोफेल्ड करत असतो. या अत्यंत बुद्धिमान परंतु खुनशी माणसाला नष्ट करायचं असेल, तर तिथे बाँडला स्वत: जाऊन महत्त्वाची माहिती गोळा करावी लागणार असते आणि तेही स्पेक्टरच्या माणसांच्या नजरेस न पडता. पण त्यासाठी अत्यंत वेगाने हालचाल करणा-या एखाद्या व्यक्तीची त्याला गरज भासणार होती... "प्रत्येक पुरुषाला आपण जेम्स बाँड व्हावं असं वाटतं आणि प्रत्येक स्त्रीला आपण त्याच्या अंथरुणात शिरावं असं वाटतं."