-
Deh Jao Athwa Jao (देह जाओ अथवा जाओ)
बाहेर वीज चमकून नाहीशी झाली. काही क्षणाच्या अंतराने तिचा चमकदार कशीदा आभाळात उमटत राहिला. राहिला असावा! आभाळाचा थोडाही अंश इथून असा नजरेला पडत नव्हता. तरी काही क्षणाच्या अंतराने उमटणारे तिच्या चमकदार आवर्तनात थेट बाहेर दिसणारा मर्यादित परिसर लख्ख चांदीचा होऊंन जात होता. इथे सकाळी मी ज्या वाटेवरून आलो होतो . ती वाट- वाट कसली, मातीच पटांगण - त्यावेळी त्याचं स्वरुपही माझ्या लक्षात आलं नव्हत ; पण आत चमकणाऱ्या विजात ते पटांगण विलक्षणस लाल- मातेरी रंगाच दिसून नाहीसं होत होतं.
-
Sanjwa ( सांजवा)
संध्याकाळ निसटुन जाताना कधी कधी संधि प्रकाश पसरतो. आता अंधार पडणार आहे की उजेड लागणार आहे, असा संभ्रम पडावा इतका गूढ़. गूढ़ आणि हुरहुर लावणारा...... काहींच्या आयुष्यांतही असा ' संजावा पसरतो. संकट संपणार आहे की तीव्र होणार आहे. या संभ्रमामूळे अस्वस्थ्तेचे काहूर मनात भिनते. तरी ही, मानसे नेटाने जगत, लढत राहतात. जिंकतात त्या अनुभवातून येणारी उमेद हीच त्यांच्या जगण्याची , 'श्रीशिल्लक' ! ' सांजवा' तल्या पाचही कथा ती श्रीशिल्लक' वाचकाच्या मनातही जागी करतात. जुन्या काळातल्या पात्रांच्या आणि भिन्न भिन्न जीवनशैलीतील्या या कथा, आशय आणि अनोख्या शब्दकळेमूळे सदैव ताज्या वाटणार्या आहेत.
-
Vegali Nazar (वेगळी नजर)
'वेगळी नजर' या रहस्य कथा संग्रहातील प्रत्येक कथेतील स्त्री-पुरुष व्यक्तिरेखा अंतर्यामी काहीतरी विशिष्ट हेतु मनांत बालागुनाच अगदी टोकाची भूमिका घेत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. या कथा वाचतांना वाचक चक्रावून जातो आणि यातील रहस्य उलघदे वाचताच राहतो! यातच प्रत्येक कथेचे रहस्य व यश दडलेले आहे..