-
1946 Swatantryach Antim Yuddha (१९४६ स्वातंत्र्याचं अंतिम युद्ध)
फेब्रुवारी १९४६ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीचे सुमारे २०,००० नौसैनिक ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठावाला उभे राहिले. खराब सेवा अटी, वांशिक भेदभाव आणि ब्रिटीशांच्या वागणुकीविरोधात त्यांनी उठाव केला. बंडाची सुरुवात मुंबईत झाली आणि नंतर कराची, कलकत्ता, मद्राससारख्या बंदरांमध्ये झपाट्याने पसरली. नौसैनिकांनी ब्रिटीश झेंड्याऐवजी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे फडकावून राजकीय ऐक्य दाखवले. हे बंड केवळ आठवड्याभरात दडपण्यात आले, परंतु यामुळे ब्रिटीश साम्राज्याच्या पायाखालची जमीन हादरली आणि भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रक्रियेला गती मिळाली. १९४६ : लास्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे प्रमोद कपूर लिखित पुस्तक या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनाक्रमावर प्रकाश टाकते. सखोल संशोधन व ओघवत्या लेखनशैलीतून लेखकाने या नौसैनिक उठावाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे पुस्तक त्या तरुण नौसैनिकांना मानवंदना आहे, ज्यांनी साम्राज्यशाहीविरुद्ध उठून उभं राहण्याचं धाडस केलं.
-
Maharudra (महारूद्र)
पहिल्या प्रयत्नातच कुशल खेळाडूप्रमाणे कुठल्याही खेळाची लय भीमरावांना साधत असे. या दैवी देणगीला कठोर कष्टांची जोड देऊन भीमरावांनी फुटबॉल बहरवला. या खेळाचा स्थायीभाव आहे, त्या खेळाची विलक्षण गती. भीमरावांना सहजसाध्य असलेले अनेक खेळ होते, परंतु फुटबॉलकडे लक्ष द्यायचं असं न ठरवताही भीमराव फुटबॉलमध्येच रमले. कारण या खेळाची नैसर्गिक गती आणि भीमरावांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य वेग यातील ताळमेळ सहज होता. फुटबॉलमध्ये नावारूपास येणं हे त्यांच्या अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्वाचं सहजसुंदर प्रकटीकरण होतं. फुटबॉलशी त्यांचं नातं ही सर्वात नैसर्गिक गोष्ट होती.
-
Kulamamachya Deshat( कुलामामाच्या देशात)
कोरकु भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघोबा. मेळघाटच्या जंगलातला हा कुलामामा जेवढा काळजात धडकी भरवणारा, तितकीच त्याच्याबद्दलची उत्सुकताही अधिक. रानवाटा तुडवत कुलामामाचं दर्शन घेताना इथं वनअधिकाऱ्यांनाही जद्दोजहद करावी लागते...पण त्यातूनच काही खुसखुशीत प्रसंग, पेचप्रसंग निर्माण होतात. असेच हे ‘कुलामामाच्या देशातले’ रंगतदात प्रसंग. वनाधिकारी रवींद्र वानखडे यांच्या सुरस जंगलकथा आणि जी.बी. देशमुख यांच्या खुमासदार लेखनशैलीचा हा अद्भुत मिलाफ.