-
Athak (अथक)
पुनर्वसन केंद्रातील अपंग जवानांच्या वास्तव कहाण्यांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली कादंबरी आहे ‘अथक.’ कर्नल मुखर्जी या पुनर्वसन केंद्राचे प्रमुख आहेत. नायक सुरेश कार्की यांचं छातीपासून खालचं शरीर एका अपघातामुळे लुळं झालं. पुण्यातील खडकीच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दाखल झाले. आता त्यांनी बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य प्राप्त करून जागतिक क्रमवारीत स्थान पटकावलं आहे. मृदुल घोष हा जवान विमानांची देखभाल-दुरुस्ती करणारा. अपघातात त्याचं मानेपासून खालचं शरीर लुळं पडलं; पण आता तो तोंडात ब्रश घेऊन उत्तम चित्र काढतो. अशा आणखी काही जवानांच्या कहाण्या यात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेफाली आणि क्षितिज हे तरुण-तरुणी सर्वसामान्य अपंगांसाठी कन्नू मेहता सेंटर सुरू करतात. जवानांच्या प्रचंड इच्छाशक्तीची आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य अपंगासाठी सेंटर सुरू करणार्या शेफाली आणि क्षितिजची ही प्रेरणादायक कहाणी.
-
Blotting Paper (ब्लॉटिंग पेपर)
जेव्हा मनरूपी शेतात रुजतं तेव्हा मग उगवतात अंकुर...त्या अंकुरांना मग कुठलाही आकृतिबंध चालतो...लेख, कविता, पत्र, व्यक्तिचित्र...याच आकृतिबंधांतून स्वाती चांदोरकर व्यक्त झाल्यात मुक्तपणे...नातीला बडबडगीतं ऐकवताना त्यांना बडबडगीतांबाबत सुचतो एक वेगळाच विचार...मृत्यूबाबतही त्या करतात चिंतन... माणसाचं जीवन आणि मन...भावनांनी-विचारांनी व्यापलेलं...व्यक्तींनी गजबजलेलं...नात्यांनी बांधलेलं...साहित्यादी कलांनी रसरसलेलं...हे व्यापणं, गजबजणं, बांधणं, रसरसणं कधी रमतात शान्ताबाईंच्या कवितांमध्ये...तर कधी रमतात अरुण दातेंच्या आठवणींमध्ये...पतीबरोबरच्या आत्मीयतेने पत्र लिहितात त्या... स्वातीताईंच्या या सगळ्याच लेखनाला चिंतनाची डूब आहे आणि भावनेचा ओलावाही सहजीवनात काय कमावलं-गमावलं हे सांगताना पतीच्या आणि स्वत:च्याही व्यक्तिमत्त्वाबाबत बोलून जातात सहजपणे...कृष्णाच्याही अंतरंगात डोकवावंसं वाटतं त्यांना...चंद्रमोहन यांच्या पुस्तकाबद्दलही भरभरून बोलावंसं वाटतं...सुनील मेहतांना...एक लय साधली आहे त्यांनी या लेखनातून...ती लय वाचकांना गुंतवून ठेवेल, अंतर्मुख करेल आणि परमानंद देईल हे नक्की
-
Saapshidi (सापशिडी)
‘अपने धर्म पर चलो’ या कथेतील बाबासाहेबांना निवृत्तीनंतर जीवनाचा अर्थ कळतो...तर ‘एक केस आहे’मधून सायक्रॅटिस्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांची अस्वस्थता अधोरेखित होते...तुमच्या कुकर्माचे परिणाम तुम्हाला पुढल्या जन्मात भोगावे लागतात, असा संदेश देते ‘नारायण ऽऽ नारायण’ ही कथा...तर ‘मृत्यूतला जन्म’मधून प्रकट होतं जुन्या-नव्याचं िंचतन...‘राग पिलू’मधील संगीत आणि चित्रकलेतील भावबंधाला नजर लागते एका अहंकारी गायकाची...‘वांझ’मधल्या बाईजींना दोन मुलींची आई असूनही वांझ असल्यासारखं वाटतं...‘सापशिडी’तील रंजनाला जीवनाच्या सफलतेचा आनंद होत असतानाच ती परत अस्वस्थतेच्या गर्तेत फेकली जाते... ‘होय सो होय’ ही कथा नियतीच्या अटळतेचं अधोरेखन करते...जीवनाची सापशिडी ही अशीच चालू असते, कधी खाली कधी वर...पण या वर-खालीच्या अवकाशात भोगायला लागतात दु:खं अनेक...दु:खाच्या नाना परी भोगत असतात माणसं...अशाच माणसांचं मनोविश्व आणि जीवन सामोरं आणणार्या कथांचा संग्रह
-
Krushnasakha (कृष्णसखा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
-
Krushnarang Savala (कृष्णरंगसावळा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
-
Tod (तोड)
< BACK TOD by SWATI CHANDORKAR 0 Reviews facebook sharing buttontwitter sharing buttonpinterest sharing buttonwhatsapp sharing buttonlinkedin sharing buttonblogger sharing buttontelegram sharing buttonemail sharing button Previous Next* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately. Original Book Title: TOD Availability : Available ISBN : 9789392482205 Edition : 1 Pages : 152 Language : MARATHI Category : FICTION Quantity 1 INR 200.00+ ADD TO CARTBuying Options: Ebooks: Print Books: Summary(English) Summary(Marathi) Awards Translation Adaptation Youtube Audio ऊसतोडीच्या हंगामाला जायच्या तयारीत असतानाच शिवाचा सर्पदंशाने मृत्यू होतो. त्याची बायको भिकू सासऱ्याबरोबर (दगडू) आपली तान्ही मुलगी बारकी हिच्यासह ऊसतोड हंगामाला खुर्डावाडीला जाते. बारकीच्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला असं वाटून तिचे सासू-सासरे बारकीचा रागराग करत असतात. खुर्डावाडीला गेल्यावरही दगडू बारकीचा दुस्वास करतच राहतो. तो बारकीवर राग काढण्यासाठी टोकाचं पाऊल उचलेल या भीतीने भिकू भूमीताईंकडे काही वेळेला बारकीला सांभाळायला देते. ऊसतोड मजुरांना भाड्याने जागा देणाऱ्या, एकाकी असलेल्या भूमीताईंना बारकी ऊर्फ गौरीचा लळा लागतो. हंगाम संपल्यानंतर दगडूच्या गौरीला बरोबर न नेण्याच्या दुराग्रहामुळे भिकू नाईलाजाने गौरीला भूमीताईंकडेच ठेवते. भिकूने मागितल्यावर भूमीताईंनी गौरीला परत द्यायचं, असा लेखी करार झालेला असतो; पण प्रत्यक्षात जेव्हा गौरीला परत द्यायची वेळ येते तेव्हा काय होतं? ऊसतोड कामगारांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेलं एक उत्कट भावनाट्य.
-
Shesh (शेष)
भूक माणसाला किती लाचार बनवते! आम्ही सगळ्या बहिणी दोन वेळचं पोटाला काही मिळावं म्हणून वणवण करत होतो. वय लहान, आणि भूक मोठी. जेवणाच्या वेळेला कुणाच्या तरी दारात जाऊन उभं राहायचं. नाइलाज म्हणून त्या घरातली बाई आत बोलवायची आणि मग तिच्या रागासकट, तिच्या जिव्हारी लागणार्या शब्दांसकट जे पानात पडेल ते गिळायचं. त्या घरातल्या पुरुषाची नजर अंगावरून फिरत राहायची. किळस यायची- जणू ती नजर नग्न करत आहे. पण निर्लज्ज व्हायचं; कारण पोटात भुकेचा वणवा पेटलेला असायचा. आणि तोच वणवा त्या पुरुषाच्या नजरेत पेटलेला असायचा. दोन्ही भुका शारीरिक.....एक भूक वणवा शमवणारी आणि एक भूक वणवा अजून चेतवणारी...
-
His Day (हिज डे)
समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या...’
-
Pavitram (पवित्रम्)
"सोडून देतो मांझ काम.पण जसे जन्म होत राहतात,तसेच मृतयुही.मग त्या कलेवरांचं काय करायचं? कोण दशक्रिया करणार,अग्नि देणार?कारण ही कलेवरं जर अग्निरहित राहिली तर रोगराई पसरेल. प्रेत खालच्या जातीतलं की वरच्या ह्यांन काय फरक पडणार? सडताना जात दिसत नाही."सगळे स्तब्ध झाले. दत्तू पुजारी शांतपणे उठला... कालिंदी म्हणाली,"तुम्ही योग्य तेच केलंत.आत्तपर्यंत प्रत्येक शुभकार्यात मला टाळण्यत आलं.हीन वागणूक देण्यात आली.आता नदी पलीकडच्यांनीही मला टाळावं? शेवंताकडे बारसं होतं.मला नाही बोलावलं.ही एवदीशी होती शेवंता.जेव्हा हीला.वैद्य त्या वस्तीत यायला तायर नव्हते की तिला इथे आणलेलं त्यांना चालत नव्हतं.त्यांनाही आता पवित्र-अपवित्र जाणवू लागलं?" दाराआडून एकणारा गोविंदा मात्र दुखावला.जो त्रास वर्गातील मुलं आपल्याला देतात,तसाच त्रास ही मोठी माणसं आईबाबांनाही देतात? मग तयांचजवळ तक्रार ती काय करायची?
-
kalakabhinna (काळाकभिन्न)
काळाकभिन्न' काळोख आणि त्यातूनच होणारा मनुष्याचा जन्म ! मग 'टाहो' फोडत या 'आटपाट नगरी'त होणारा जीवनाचा प्रवास ! या प्रवासात मिळतात आई-वडिल, नातेवाईक, सखे-सोबती. जीवन फुलत जातं. वळणावर भेटते 'सहेलियोंकी बाडी'. मन गुंग होतं. स्तिमित होतं. 'अल्याड-पल्याड'ची जाणीव राहत नाही. मग कधीतरी मनुष्याचा उबग येतो आणि यंत्रं मित्र होतात. 'मी आणि चॅमी' मौत्री जुळते. 'हरवले आहेत' या मथळ्याखाली जेव्हा नावांची यादी फोटोंसकट वर्तमानपत्रांतून वाचनात येते तेव्हा 'वस्तुस्थिती'ची जाणीव होते. मनुष्य आणि मनुष्य जातींची आपापसातली नाती म्हणजे केवळ 'हिशोब' होऊन राहतात. शरीर आणि मन म्हातारं होतं. रिकामंही होतं, कारण आता काय शोधायचं हा प्रश्न आऽ वासून उभा राहतो. रिकाम्या वेळेचा चाळा म्हणून अनेक वर्षं धूळ खात पडलेला 'अल्बम' बाहेर काढला जातो आणि त्या पिवळ्या पडत जाणा-या फोटोंमधून आठवणींचं इंद्रधनुष्य स्वत:च्या बालपणाच्या याऽऽ टोकापासून ते स्वत:च्या मुलांच्या तारुण्याच्या त्याऽऽ टोकापर्यंत अर्धगोल उमटतं. अंधुकसं, धूसरसं, चष्म्याच्या काचा थेंबाथेंबाने ओलावत !
-
vapu ( वपु )
एक कलाकार आणि एक माणूस या दोनही पातळ्यांवर ते समरसून आयुष्य जगले. स्वत:जवळ देण्यासारखं जे काही होतं ते त्यांनी आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकाला दिलं. सर्वांना समृद्ध केलं. त्यांच्या या नव्या पौलूवर त्यांच्याच लेकीनं, स्वातीनं लिहिलेलं हे पुस्तक आपल्याला त्यांच्या आठवणी देऊन समृद्ध करते. स्वत:च्या, आपल्या लाडक्या बापूंच्या चुकांची प्रांजळपणे कबुली देत स्वाती चांदोरकर लिहितात, तुम्ही मला माझ्या लग्नातला घरचा आहेर दिलात त्यात म्हटलं होतात, "आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींचं जतन कर म्हणजे आयुष्यभर अशीच हसत राहशील.' हाच संदेश तुमच्या आमच्या घरचा आहेर.