-
Cell (सेल)
डॉ. जॉर्ज विल्सन एल.ए. युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये तिसऱ्या वर्षाचा रेडिऑलॉजीचा निवासी डॉक्टर (रेसिडेंट) असतो. अमाल्गमेटेड कंपनीने तीन मोबाईल कंपन्यांच्या साह्याने ‘आयडॉक’ नावाचं एक अॅप विकसित केलेलं आहे आणि या कंपनीने वीस हजार रुग्णांवर घेतलेल्या बीटा चाचणीविषयी जॉर्जला समजतं. हे समजल्यानंतर जॉर्ज अस्वस्थच असतो. आयडॉककडून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे जॉर्जची अस्वस्थता वाढते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं तो ठरवतो. त्यासाठी तो पुरावे गोळा करायला सुरुवात करतो; पण आयडॉकचे निर्माते त्याच्या मार्गात आडवे येतात, त्याला विकत घेऊ पाहतात. ते पुरावे मिळविण्यासाठी तो काय काय उपद्व्याप करतो, त्याचा मित्र झीकडून त्याला कोणती माहिती मिळते, त्याची मैत्रीण पॉला खरंच त्याच्या बाजूने असते का, आयडॉकच्या निर्मात्यांच्या आर्थिक आमिषाला जॉर्ज बळी पडतो का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘सेल’ नक्कीच वाचली पाहिजे.
-
Pratibhecha Indradhanu (प्रतिभेचा इंद्रधनू)
कल्पनाशक्ती ही दैवी देणगी नसून, तिला विज्ञानाचा आधार आहे, हाच विषय चर्चिला गेला आहे ‘प्रतिभेचा इंद्रधनू’ या पुस्तकातून. सुबक वैज्ञानिक प्रयोग आणि अभ्यासांतून, हा विषय स्पष्ट केला आहे. शिवाय, वास्तव जगात क्रिएटिव्हिटीचे पडसाद कसे उमटतात, बॉब डिलनची लिखाणाची पद्धत आणि कवींच्या अमली पदार्थांच्या सवयी, रसायनशास्त्रज्ञासारखा विचार करणारा बार टेंडर, ऑटिस्टिक असलेला भन्नाट सर्फर, अशक्यप्राय वाटणाऱ्या समस्या सोडविणारी वेबसाईट, पिक्सार स्टुडिओजच्या पडद्यामागच्या गमती याकडेही लक्ष वेधलं आहे. यो-यो मा ‘इम्प्रूव्हाइज’ कसं करतो आणि सतत नवनवीन कल्पनांना वास्तवात आणणाऱ्या कंपन्यांचं गुपित काय, याचंही विवेचन केलं आहे. न्यूरॉन ते घासूनपुसून तयार झालेली सिम्फनी आणि मेंदूतलं सर्किट ते एखादं यशस्वी प्रॉडक्ट– यादरम्यान असलेले असंख्य पदर या पुस्तकातून उलगडून दाखवले आहेत.
-
Aayushyacha Antim Sanskar (आयुष्याचा अंतिम संस्कार
फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. २००८ साली, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्यातल्या स्ट्रेटेजिस्टने निवडणूक डावपेच रचण्याच्या हिरिरीनेच या भयानक रोगाशी सामना करायचं ठरवलं. जसजशी त्यांची प्रकृती ढासळत गेली तसतसं आपल्या कॅन्सरविषयी आणि मनातल्या विचारांविषयी लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. ‘आयुष्याचा अंतिम संस्कार...’ म्हणजे या तळमळीचाच परिपाक आहे. वाचकाला हेलावून सोडणारी ही कथा स्फुर्तिदायक ठरेल यात शंका नाही. शिवाय मानवी आयुष्य आणि नातेसंबंधांचे मर्मही यात दडले आहे, जे प्रत्येकाला विचार करायला लावेल.