Cell (सेल)
डॉ. जॉर्ज विल्सन एल.ए. युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये तिसऱ्या वर्षाचा रेडिऑलॉजीचा निवासी डॉक्टर (रेसिडेंट) असतो. अमाल्गमेटेड कंपनीने तीन मोबाईल कंपन्यांच्या साह्याने ‘आयडॉक’ नावाचं एक अॅप विकसित केलेलं आहे आणि या कंपनीने वीस हजार रुग्णांवर घेतलेल्या बीटा चाचणीविषयी जॉर्जला समजतं. हे समजल्यानंतर जॉर्ज अस्वस्थच असतो. आयडॉककडून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे जॉर्जची अस्वस्थता वाढते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं तो ठरवतो. त्यासाठी तो पुरावे गोळा करायला सुरुवात करतो; पण आयडॉकचे निर्माते त्याच्या मार्गात आडवे येतात, त्याला विकत घेऊ पाहतात. ते पुरावे मिळविण्यासाठी तो काय काय उपद्व्याप करतो, त्याचा मित्र झीकडून त्याला कोणती माहिती मिळते, त्याची मैत्रीण पॉला खरंच त्याच्या बाजूने असते का, आयडॉकच्या निर्मात्यांच्या आर्थिक आमिषाला जॉर्ज बळी पडतो का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘सेल’ नक्कीच वाचली पाहिजे.