Aayushyacha Antim Sanskar (आयुष्याचा अंतिम संस्कार
फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. २००८ साली, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्यातल्या स्ट्रेटेजिस्टने निवडणूक डावपेच रचण्याच्या हिरिरीनेच या भयानक रोगाशी सामना करायचं ठरवलं. जसजशी त्यांची प्रकृती ढासळत गेली तसतसं आपल्या कॅन्सरविषयी आणि मनातल्या विचारांविषयी लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. ‘आयुष्याचा अंतिम संस्कार...’ म्हणजे या तळमळीचाच परिपाक आहे. वाचकाला हेलावून सोडणारी ही कथा स्फुर्तिदायक ठरेल यात शंका नाही. शिवाय मानवी आयुष्य आणि नातेसंबंधांचे मर्मही यात दडले आहे, जे प्रत्येकाला विचार करायला लावेल.