-
Ajun Nahi Jagi Radha (अजून नाही जागी राधा )
‘अजून नाही जागी राधा’ ही कथा अष्टवक्रा कुब्जा, राधा आणि अर्थातच श्रीकृष्ण यांचे अनोखे स्नेहबंध उलगडते. स्वच्छंदी जीवन जगणारी; पण प्रामाणिक स्त्री आदर्श पत्नी बनून नवऱ्याने न मागितलेले वचनही कसे निभावते त्याची कथा आहे ‘सावी’. साध्यासुध्या तरुणावर मनापासून एकतर्फी प्रेम करणारी सरपंचाची मुलगी मत्सरापोटी कोणत्या थराला जाते याचे चित्रण आहे ‘हवा’च तू’ या कथेत. विवाहाच्या गाठी नियोजित असतात, याचा प्रत्यय देणारी कथा आहे ‘तरीही...’ पतिनिधनानंतर महिलांची स्वार्थी मुला-मुलींकडून होणारी परवड/हेळसांड आठवणींच्या स्वरूपात शब्दबद्ध केली आहे ‘जेचं तेच्यापाशी’ कथेत. सुधारित परग्रहाने मैत्रीसाठी पृथ्वीवासीयांना दिलेल्या संदेशाची कथा आहे ‘चॉइस’. आशयपूर्णतेचा साज ल्यायलेल्या विविधरंगी कथांचा नजराणा.
-
The Magic Of Getting What You Want (द मॅजिक ऑफ गेट
‘द मॅजिक ऑफ गेटिंग व्हॉट यू वॉन्ट’ अर्थात ‘किमया! हवे ते प्राप्त करण्याची’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आशा-आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी तुमच्यासमोर ठेवलेली ब्ल्यू-प्रिंटच. मोटिव्हेशन विषयावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या आणि ‘द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग’ या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक डॉ. डेव्हिड श्वार्त्झ यांचे ‘द मॅजिक ऑफ गेटिंग व्हॉट यू वॉन्ट’ हे तितक्याच तोलामोलाचे पुस्तक अतिशय वाचनीय, वास्तववादी आणि मनाला उभारी देणारे आहे. आयुष्याकडे आणि प्रत्येक समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले, आपले ध्येय कल्पकतेने निश्चित करून त्याप्रमाणे कृती केली तर आपण भरभरून समृद्धी मिळवू शकतो, समाजावर जबरदस्त प्रभाव टाकू शकतो आणि जीवनातला आनंद मनमुराद उपभोगू शकतो, हे या पुस्तकात प्रामुख्याने सांगितले आहे. ते कसे करायचे याचे विस्तृत मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.
-
Dadlela Itihas (दडलेला इतिहास)
‘दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत: सिक्रेट सोसायटीची स्थापना केली व त्याद्वारेच मानवतेविरुद्ध घडवून आणलेला अतिशय क्रूर पाशवी गुन्हा म्हणजे पहिले महायुद्ध. जगापासून आपली गुन्हेगारी लपवून ठेवण्यासाठी या लोकांनी जाणूनबुजून युद्धाच्या उगमांची खोटी व दिशाभूल करणारी कारणे कशी तयार केली व ती खोट्या इतिहासाद्वारे जगासमोर कशी मांडली हे या पुस्तकाने उघड करून दाखविले आहे. (हाच खोटा इतिहास गेल्या शतकभर शाळा-कॉलेजांतून व विद्यापीठांतून शिकविला जातो आहे.) या पुस्तकातून एक खेचून घेणारे आव्हान उभे केले आहे व लेखकद्वयाचे एवढेच सांगणे आहे की, त्यांनी तुमच्यासमोर मांडलेल्या पुराव्यातले सत्य वाचकांनी पडताळून पाहावे.