Ajun Nahi Jagi Radha (अजून नाही जागी राधा )
‘अजून नाही जागी राधा’ ही कथा अष्टवक्रा कुब्जा, राधा आणि अर्थातच श्रीकृष्ण यांचे अनोखे स्नेहबंध उलगडते. स्वच्छंदी जीवन जगणारी; पण प्रामाणिक स्त्री आदर्श पत्नी बनून नवऱ्याने न मागितलेले वचनही कसे निभावते त्याची कथा आहे ‘सावी’. साध्यासुध्या तरुणावर मनापासून एकतर्फी प्रेम करणारी सरपंचाची मुलगी मत्सरापोटी कोणत्या थराला जाते याचे चित्रण आहे ‘हवा’च तू’ या कथेत. विवाहाच्या गाठी नियोजित असतात, याचा प्रत्यय देणारी कथा आहे ‘तरीही...’ पतिनिधनानंतर महिलांची स्वार्थी मुला-मुलींकडून होणारी परवड/हेळसांड आठवणींच्या स्वरूपात शब्दबद्ध केली आहे ‘जेचं तेच्यापाशी’ कथेत. सुधारित परग्रहाने मैत्रीसाठी पृथ्वीवासीयांना दिलेल्या संदेशाची कथा आहे ‘चॉइस’. आशयपूर्णतेचा साज ल्यायलेल्या विविधरंगी कथांचा नजराणा.