Dalal's Street (दलाल्स स्ट्रीट)

"एका इंडियन बिझिनेस स्कूलच्या तरुण पदवीधारकांचा गट गलेलठ्ठ पगार देऊ करणार्‍या ट्रेडिंग कंपनीच्या नोकरीकडे आकृष्ट होतो. स्टॉक ब्रोकिंगसारख्या अत्यंत गतिमान आणि भयानक स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्याकडे या बॅचमधील मित्रांचं सगळं लक्ष एकवटलेलं असतं. हाव, लबाडी, आणि संपत्ती ही या जगात टिकून राहण्याची आणि यशस्वी होण्याची पहिली पायरी असते. जे अस्तित्व टिकवून ठेऊ शकत, ते विजेते ठरत. हा आर्थिक थरार या कादंबरीत डार्क ह्युमरमध्ये रंगवलेला अनुभवायला मिळतो. इथे अस्तित्वाच्या लढाईत जिवलग मित्र कट्टर प्रतिस्पर्धी बनतात, प्रत्येक उपहासात्मक हास्यामागे एक धमकी असते, आणि व्यापार-खेळासारखा पैसा आणि भविष्य सर्वच पणाला लावून दुसर्‍यावर कुरघोडी करून झटपट जिंकायचं, ही या जगाची रीतच असते. शेअर्सच्या किंमतीतील चढ आणि उतारांचं अधिराज्य असलेल्या या बाजारातल्या मानवी संबंधातील गुंतागुंतीच्या क्रिया-प्रतिक्रिया आणि डाव-प्रतिडाव यांचा ‘दलाल्स स्ट्रीट’ शोध घेतं आणि सर्व अग्निपरीक्षांतून पार होणार्‍या नायकाच्या उदयाचं चित्र कोरून समोर ठेवतं. "

Book Details

ADD TO BAG