-
The Mother (द मदर)
चीनमधील एका छोट्या खेड्यातील तीन मुलांची (दोन मुलगे, एक आंधळी मुलगी) आई...सासू, नवरा, मुलं यांची काळजी घेते...नवऱ्याच्या बरोबरीने शेतात राबते...समोर राहणाऱ्या चुलत जावेशी, दिराशी स्नेहाने वागते...नवरा अचानक परागंदा होतो...खोटी पत्रं लिहून घेऊन तो शहरात नोकरीसाठी गेल्याची बतावणी तिला करायला लागते...प्रपंचाचा गाडा एकटीच ओढत असते...जमीनदाराच्या मुनिमाची नजर तिच्यावर पडते...हो-ना करता ती त्याच्या अभिलाषेला बळी पडते आणि तिला दिवस राहतात...दरम्यान, स्वत:चा नवरा शहरात जळून मेल्याचं खोटं पत्र लिहून तिने स्वत:ला विधवा म्हणून जाहीर केलेलं असतं...मुनिमाने झिडकारल्यामुळे तिला गर्भपात करावा लागतो...यथावकाश तिचा थोरला मुलगा हाताशी येऊन कुटुंबाची जबाबदारी घेतो...धाकटा मुलगा शहरात जातो...थोरल्याचं लग्न होतं, सून घरात येते...तिच्या आंधळ्या मुलीचं लग्न होतं, पण ती मुलगी मरण पावते...तिच्या धाकट्या मुलाचाही शिरच्छेद केला जातो...असे दु:खाचे आघात होत असतानाच तिला नातू होतो...एका आईच्या जीवनाचं बहुपदरी भावनाट्य.
-
The Old Man And The Sea (द ओल्ड मॅन अँड द सी)
The Old Man and the Sea (Marathi). साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेली लघुकादंबरी 'आशा न करणं मूर्खपणाचं आहे, ते पाप आहे असं त्याचं म्हणणं होतं.' हवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा. हेमिंग्वेची ही उत्कृष्ट कथा आहे एक म्हातारा, एक लहान मुलगा आणि एक महाकाय मासा यांची कहाणी. या कमालीच्या शौर्यकथेने हेमिंग्वेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल...
-
Pidhi Dar Pidhi (पिढी दर पिढी)
ही कादंबरी वांग युआन या तरुणाच्या जीवनाभोवती फिरते. त्याचे वडील टायगर वांग सरदार असतात. सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेत राहून शिकणारा युआन अचानक घरी येतो; कारण क्रांतिकारकांच्या सैन्यामध्ये जाऊन स्वतःच्या वडिलांविरुद्ध त्याला लढायचं नसतं. त्यानंतर आजोबांच्या जुन्या मातीच्या घरात रमलेल्या युआनला टायगर पुन्हा घरी बोलावतो, तेव्हा युआन रागानं घराबाहेर पडतो आणि आपल्या सावत्र आईकडे जातो. तिथे त्याला आय-लान ही बहीण, तसेच जमीनदार वांग आणि व्यापारी वांग हे दोन थोरले काका आणि त्यांची बायका-मुलं असा गोतावळा भेटतो. शिक्षणासाठी युआन परदेशी जातो. मोठ्या विद्यापीठात शेतकी शास्त्राचं शिक्षण घेऊन सहा वर्षांनंतर मायदेशी परत येतो. आईने आश्रमातून सांभाळायला आणलेली, डॉक्टर होऊ इाQच्छणारी मी-लिंग युआनला आवडते. मात्र, तिला प्रथम शिक्षण पूर्ण करायचे असते. युआनही वडिलांचे कर्ज फेडणे आपले कर्तव्य आहे असे मानून नोकरी करू लागतो. वास्तवता-भावपूर्णतेचा अनोखा संगम.