The Mother (द मदर)
चीनमधील एका छोट्या खेड्यातील तीन मुलांची (दोन मुलगे, एक आंधळी मुलगी) आई...सासू, नवरा, मुलं यांची काळजी घेते...नवऱ्याच्या बरोबरीने शेतात राबते...समोर राहणाऱ्या चुलत जावेशी, दिराशी स्नेहाने वागते...नवरा अचानक परागंदा होतो...खोटी पत्रं लिहून घेऊन तो शहरात नोकरीसाठी गेल्याची बतावणी तिला करायला लागते...प्रपंचाचा गाडा एकटीच ओढत असते...जमीनदाराच्या मुनिमाची नजर तिच्यावर पडते...हो-ना करता ती त्याच्या अभिलाषेला बळी पडते आणि तिला दिवस राहतात...दरम्यान, स्वत:चा नवरा शहरात जळून मेल्याचं खोटं पत्र लिहून तिने स्वत:ला विधवा म्हणून जाहीर केलेलं असतं...मुनिमाने झिडकारल्यामुळे तिला गर्भपात करावा लागतो...यथावकाश तिचा थोरला मुलगा हाताशी येऊन कुटुंबाची जबाबदारी घेतो...धाकटा मुलगा शहरात जातो...थोरल्याचं लग्न होतं, सून घरात येते...तिच्या आंधळ्या मुलीचं लग्न होतं, पण ती मुलगी मरण पावते...तिच्या धाकट्या मुलाचाही शिरच्छेद केला जातो...असे दु:खाचे आघात होत असतानाच तिला नातू होतो...एका आईच्या जीवनाचं बहुपदरी भावनाट्य.