-
Mazadache Jadugar (माझदाचे जादूगार)
"‘माझदाचे जादूगार’ ह्या पुस्तकाचं कथानक भूतकाळातून आणि विविध भौगोलिक वैशिष्ट्यांच्या प्रदेशातून वेड्यावाकड्या पद्धतीनं वाट काढत प्रवास करतं. हे कथानक, इस्लामिक जिहादचा कालखंड, मॅसिडोनियन सूडाचा कालखंड, अकिमेनिड साम्राज्याच्या वैभवाचं युग, प्रेषिताच्या जन्माचं युग, आर्यांमध्ये पडलेल्या फुटीचा कालखंड ... अशा कित्येक कालखंडांमधून चित्तथरारक प्रवास करत, अखेरीस ह्या सगळ्याची जिथून सुरुवात झाली होती, तिथे ... म्हणजेच वेदकालीन उगमापाशी येऊन पोचतं. ही अश्विन सांघी यांची आतापर्यंतची सर्वात प्रक्षोभक आणि मनाची पकड घेणारी कादंबरी आहे. "
-
October Rains (आक्टोबर रेन्स )
प्रेमाचा रस्ता अहंभावाच्या विरक्तीतून जातो. असाच प्रवास डायना करते. एफेसस, आर्टेमिस आणि मदर मेरीची गोष्ट सांगत सांगत तिची गोष्ट बहरत जाते. तिचा हा प्रवास आहे गुलाबांच्या मातीत मिसळण्याच्या, शून्यत्वाच्या शोधाचा. या शोधातच तिला प्रेम गवसतं. सेरकानसोबतचा तिचा हा प्रवास आत्मानुभूतीच्या मार्गावर नेतो. आणि एकमेकांची भाषाही न जाणणारे हे दोघे जीवनाच्या एकाच सत्यापाशी पोचतात. ते म्हणजे दोघांना स्वतंत्रपणे आकळलेलं प्रेम. मथायसपासून विलग होताना ती ज्या डायना ज्या भावनिक टप्प्यावर असते, ते सारे टप्पे या प्रवासात विलीन होत जातात. आणि माणसातल्या अहंभावासारख्या नकारात्मकेकडे दुर्लक्ष करत डायना निव्वळ स्वीकारभावापर्यंत पोहचते. प्रेमातल्या स्वीकाराच्या सहजभावा मंत्र सांगणारी ही अफलातून कादंबरी.
-
Amap Pani (अमाप पाणी)
द टाइम क्विन्टेट मालिकेतील हे चौथं पुस्तक. मरी कुटुंबातली मुलं आता मोठी झाली आहेत. सँडी आणि डेनीस ही जुळी मुलं तशी सर्वसामान्य मुलांसारखीच. पण पौगंडावस्थेतले हे दोघे आई-वडिलांच्या प्रयोगशाळेत असताना अनवधानाने एका चालू प्रयोगात ढवळाढवळ करतात आणि काळाच्या सीमा ओलांडून अतिप्राचीन काळातल्या निर्मनुष्य वाळवंटात जाऊन पोचतात. हा काळ असतो ‘नोहा आणि त्याचे जहाज’ या बायबलमधील पौराणिक गोष्टीतला...या काळाची वाट हरवलेल्या मुलांना पुढे अनेक बऱ्यावाईट अद्भुत प्रसंगांना सामोरं जावं लागतं. यातला अप्रतिम कल्पनाविलास वाचकांना खिळवून ठेवतो.
-
Kalpatavaril Surkuti (कालपटलावरील सुरकुती)
वैज्ञानिक अद्भुतिकांमधील अफलातून कथानक म्हणजे हे पुस्तक. चार्ल्स वॉलेस वडिलांचा शोध घेत एका राक्षसी ग्रहावर पोहचतो. तिथलं सर्व जीवनमान ‘इट’ या आक्रमक शक्तीचे गुलाम बनले आहे. या आक्रमक शक्तीपासून पृथ्वीची आणि पर्यायाने आपल्या वडिलांचीही सुटका करण्यासाठी चार्ल्सचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात त्याची बहीण मेग, तिचा मित्र केल्विन आणि तीन अद्भुत व्यक्तीरेखांची त्याला साथ मिळते आहे. या अद्भुत व्यक्तीरेखा चार्ल्सला मार्ग तर दाखवतातच, पण आपल्या कारनाम्यांनी कथानकात रंगतही भरतात.
-
Vegane Kalnara Graha (वेगाने कलणारा ग्रह)
द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे तिसरं पुस्तक. पंधरा वर्षांच्या चार्ल्स वॉलेसपुढं नवं आव्हान ठेपलं आहे. ते आव्हान आहे, मॅड डॉग ब्रॅन्झिलोच्या विनाशकारी विचारांपासून पृथ्वीला वाचवण्याचं. या कामी चार्ल्सला सोबत लाभलीय एका एकशिंगी अद्भुत घोड्याची. चार्ल्सच्या या कालप्रवासात त्याला इतिहासातल्या व्यक्तीरेखांच्या आत प्रवेश करून भविष्यात विनाशकारी ठरणाऱ्या विचारांना थोपवायचं आहे. आशा आणि विश्वासाच्या रूजवणीचा हा चार्ल्सचा प्रवास एका अद्भुतिकेला जन्म देणारा आहे. ज्यात त्याची बहीण मेग कायथिंग करून चार्ल्सचं मनोबल वाढवण्यासाठी सज्ज आहे.
-
Anukul Kaal (अनुकूल काळ)
द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे पाचवं पुस्तक. पॉली ओ’कीफ नुकतीच तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहायला आलेली असते. तिचे आजोबा-आजी म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अॅलेक्स आणि केट मरी. पॉली तिच्या वर्तमानकाळापासून तीन हजार वर्षे आधीच्या भूतकाळात भरकटत जाते. ‘बहुतेक तो अपघात नसावाच’ असं तिला दोन ड्रूइड्स सांगतात. ते तिला सांगतात : ‘जेव्हा जेव्हा काळाचं द्वार उघडतं, तेव्हा तेव्हा त्याला निश्चित कारण असतं’. पॉली आणि तिचा गंभीर आजारी मित्र झॅकरी, भूतकाळात गेल्यावर लगेच काळाचं दार बंद होतं, तेव्हा त्यामागचं कारण स्पष्टपणे समजू लागतं. काळाचं दार पुन्हा खुलं होईपर्यंत अशा निराशाजनक काळात पॉली स्वत:ला आणि झॅकरीला जिवंत ठेवू शकेल का? ते दार उघडलं तरच ते घरी परत येऊ शकणार आहेत.
-
Daratil Vadal (दारातील वादळ)
ए विंड इन द डोअर अर्थात दारातील वादळ हे द टाइम क्विन्टेट मालिकेतील दुसरं पुस्तक. मेग मरी आणि चार्ल्स वॉलेसच्या धाडसाची ही नवी कहाणी. पण यात मेगचा मित्र कॅल्विनचीही प्रमुख भूमिका आहे. या गोष्टीत काल्विन मेगचा पाठीराखा आणि सोबती म्हणून खऱ्या अर्थाने समोर येतो. पृथ्वीच्या विनाशावर टपलेले इक्थ्रॉय आणि प्रोगिनॉस्कीसच्या मदतीनं मेग मरी आणि चार्ल्स वॉलेसनं त्यांच्या विरोधात दिलेल्या लढ्याची ही गोष्ट. प्रत्येक वेळी, जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होतो, तेव्हा आणखी एका इक्थ्रॉयनं लढाई जिंकलेली असते.