-
The Hidden Hindu Part 3 (द हिडन हिंदू भाग ३ )
"देवध्वज नक्की कोण आहे, नागेंद्र की ओम? परिमल आणि एलएसडी एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तर नागेंद्र मृतातून पुनरुत्थित झाला आहे. असुरक्षित आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. परशुराम आणि कृपाचार्य ओमच्या कोलमडलेल्या भूतकाळात अडकले आहेत तर वृषकपी निश्चित मृत्यूशी लढत आहेत, ज्याने आधीच मिलारेपाला संपवलं आहे. पराक्रमी अश्वत्थामाला अनभिज्ञ सोडून, इतर सर्व चिरंजिवी सर्व आघाड्यांवरून निघून गेले आहेत. उरलेले शब्द कुठे लपले आहेत? नागेंद्र त्या सर्वांना शोधून श्लोक पूर्ण करेल की अमर त्याला रोखू शकेल? काळाशी झगडत असलेल्या चिरंजिवीच्या अनपेक्षित रहस्याचा उलगडा..."
-
The Hidden Hindu Part 2 (द हिडन हिंदू भाग २)
ओम अनोळखी ठिकाणी डोळे उघडतो, त्याच्या भूतकाळासंबंधीची उत्तरं तो अजून शोधतोय. दृष्ट प्रवृत्तींनी मृत संजीवनीचं पुस्तक हस्तगत केलंय, अशा परिस्थितीत जो सदाचारी आहे तो विजयी होईल? सद्गुणांचा विजय होईल? मृत संजीवनीत अशी कोणती गुपितं दडली आहेत, जी चुकीच्या हातात पडली तर गहजब माजेल आणि विनाश होईल? ओम कोण आहे? LSD चं आणि परिमलचं वास्तव काय आहे? बाकीचे चिरंजीव कुठे लपले आहेत? विचित्र, गूढ ठिकाणी विखुरलेले हे शब्द आहेत तरी काय आणि नागेंद्र ते का गोळा करतोय? मर्त्य मानव, देवता आणि दानव या सगळ्यांसाठी अमरत्वापेक्षाही मोठं उद्दिष्ट ज्यात दडलं आहे अशा शब्दांचा शोध ती अतूट त्रयी घेत असताना, त्यांच्यासोबतच ‘द हिडन हिंदू २` मधून तुम्ही कधीही न पाहिलेल्या प्रदेशांची उत्कंठावर्धक सफर करायला सज्ज व्हा.
-
The Hidden Hindu Part 1 (द हिडन हिंदू भाग १ )
"एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला. मर्त्य जगाचे नियम धुडकावणार्या ओमच्या अतर्क्य भूतकाळाच्या या साक्षात्कारामुळे तिथे असणारा प्रत्येक जण चक्रावून गेला. त्या टीमला असाही शोध लागला की, प्रत्येक युगातल्या इतर चिरंजीव व्यक्तींच्या शोधात ओम होता. ही विलक्षण गुपितं जगासमोर आली असती तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या धारणांना धक्का बसू शकला असता आणि येणारं भविष्य बदलून गेलं असतं. तर मग, हा ओम शास्त्री आहे तरी कोण? त्याला का पकडण्यात आलं? पृथ्वी त्याचा शोध का घेत आहे? चला तर मग, या उत्कंठावर्धक प्रवासात ओम शास्त्रीची गुपितं, पृथ्वीचा शोध आणि हिंदू पुराणकथांमधील इतर गूढ चिरंजीवांची साहसं यांचे आपणही सहप्रवासी होऊ यात.
-
Reporting Pakistan (रिपोर्टींग पाकिस्तान)
ज्येष्ठ पत्रकार मीना मेनन. `हिंदू` वर्तमानपत्राच्या प्रतिनिधि म्हणून त्या ऑगस्ट २०१३ मध्ये इस्लामाबाद, पाकिस्तान इथे गेल्या. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये त्यांचा व्हिसा रिन्यू न करता त्यांना भारतात परत निघून जायला सांगितलं. इस्लामाबादमध्ये सततचे पहारे आणि तणावाचं वातावरण असूनही त्यांनी आपला पत्रकारिता धर्म सोडला नाही. हिंडण्याफिरण्यावर इतके निर्बंध असूनही त्यांनी केवळ बातम्या द्यायचं काम केलं नाही. तर `हिंदू` साठी अनेक लेख लिहिले.फाळणीतून बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला, अहमदी लोकांना भेटल्या, त्या बॉम्बस्फोटातील बळींशी बोलल्या, अफगाण रेफ्युजी कॅम्पमध्ये जाऊन आल्या आणि त्यांनी मुर्रे ब्रेवरी विषयी सुद्धा लिहिलं. मुशर्रफ यांच्या कोर्ट केसला उपस्थित राहून त्याचंही वार्तांकन केलं. पाकिस्तानातून वार्तांकन करणं ही भारतीय पत्रकारांसाठी सगळ्यात अवघड आणि तरीही रोमांचक कामगिरी समजली जाते. मीना मेनन यांनी तटस्थपणे आणि मानवीय पातळीवर पाकिस्तानचे हे वार्तांकन केले आहे. प्रत्येक भारतीयाने पाकिस्तानविषयी जाणून घेण्यासाठी वाचावे असे पुस्तक.
-
Shine Bright (शाइन ब्राइट )
प्रत्येकाला उद्योजक बनण्याची इच्छा असते. पण, केवळ याच मार्गानं तुम्ही प्रभाव टाकू शकता का? एखादा उद्योजक ज्या गोष्टी करू शकतो त्याच तुम्ही नोकरीच्या कक्षेत राहूनही करू शकत असाल तर? ‘शाइन ब्राइट’ अशाच काही प्रेरणादायी प्रवासांचा लेखाजोखा सादर करतं, जे एकाचवेळी कष्टसाध्यही आहेत आणि समाधान देणारेही आहेत. कोणत्याही नोकरीत तुम्ही ‘अडकलेले’ नसता, तुम्हीही बदल घडवू शकता– एक ‘उद्योजक’ बनू शकता...हा विश्वास हे पुस्तक रूजवतं.
-
Sagari Parikramecha Parakram (सागरी परिक्रमेचा परा
आयएनएसव्ही ‘म्हादेई’ या शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे कमांडर दिलिप दोंदे हे अशा प्रकारची पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय ठरले. ‘सागरी परिक्रमेचा पराक्रम’ या पुस्तकात त्यांचा पाच वर्षांतील प्रवास व प्रगती त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आली आहे. अनेक अडथळे आणि संकटांना तोंड देत त्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा कशी पूर्ण केली, याचे अत्यंत रोचक वर्णन त्यांनी केले आहे. विपरीत परिस्थितीचा सामना करताना एका माणसाने आपली स्वप्ने कशी साध्य केली, याची गुंगवून टाकणारी ही कहाणी एक साहसयात्रा तर आहेच, पण त्याबरोबर स्वतःवरच्या अटळ विश्वासाची विजयगाथाही आहे.
-
Mahatma Gandhi Ani Tyancha Bhartiya Sangharsh (महा
‘महात्मा गांधीं आणि त्यांचा भारतीय संघर्ष’ (ग्रेट सोल महात्मा गांधी) हे पुस्तक गांधींच्या जीवनाचा सर्वांगीण वेध घेतं. गांधींनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने, सामाजिक मूल्यांचे त्यांना आलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान परक्या उपखंडात (दक्षिण आफ्रिकेत त्यांनी घालविलेल्या दोन दशकांत) कसे फुलले, पोसले गेले आणि त्यांना ‘महात्मा’ म्हणून डोक्यावर घेणाऱ्या भारताने त्यांची तत्त्वं कशी पायदळी तुडवली, याचे वर्णन या पुस्तकात आहे. महात्मा गांधी एक प्रतिाQष्ठत वकील, जो राजकीय आणि सामाजिक कृति-कार्यक्रमांना स्वत:ला वाहून घेताना पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा होतो याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते. या नेत्याने दीर्घ काळापासून उभारलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान शेवटी भारताच्या विभाजनात, पाकिस्तानच्या निर्मितीत कसे झाले आणि जातिसंहाराच्या रक्तपाताने डागाळलेला हा प्रवास अखेरीस त्यांच्या स्वत:च्या हत्येपाशी जाऊन कसा थांबला, याचे वर्णनही या पुस्तकात आहे.
-
Mohandas (मोहनदास )
भारतीय इतिहासातील सर्वाधिक प्रभावी व्यक्ती मात्वांपैकी एक. या व्यक्तिमत्वावर आजवर विपुल लेखन, तसेच ग्रंथनिर्मिती झाली आहे. परंतु या पुस्तकात भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि जगाला सदसदविवेकाचा मार्गदर्शवणाऱ्या या व्यक्ति मत्वाबद्द्लच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रमाणिक प्रयत्न करण्यात आला आहे - गांधीचे दैनंदिन आयुष्य व जवळच्या लोकांशी नातेसंबंध कसे होते? त्यांनी इंग्रजी सत्तेशी, फूट पडलेल्या त्यांच्याच लोकांशी, त्यांच्या शत्रूशी आणि अगदी स्वतःशी कसा सामना केला? आणि हे करताना अतिप्रसिद्धी, मिथक-कथा आणि अख्खायिका यांच्या वलयामध्ये अडकलेल्या खऱ्या गांधी या पुस्तकातून जगासमोर मांडण्यचा प्रयत्न करण्यात आला आहे
-
The Boy In The Striped Pyjama's
ब्रूनोच्या पोटात एक कळ उठली. आतमध्ये, अगदी खोल मोठी खळबळ माजली आहे, हे त्याला जाणवलं... हे जे चाललं आहे; त्याचे परिणाम भविष्यकाळात कुणाला न कुणाला भोगावे लागणार आहेत हे जगाला मोठ्यानं ओरडून सांगावसं त्याला तीव्रतेनं वाटलं. ही गोष्ट दुसर्या महायुद्धाच्या सुमाराची-जर्मनीत घडणारी. या युद्धाचे जगावर झालेले भीषण परिणाम आपल्याला माहीतच आहेत; परंतु या युद्धाशी निगडित छोट््या छोट््या गोष्टींनी एका लहान मुलाच्या भावविश्वात किती मोठी उलथा-पालथ झाली त्याची ही गोष्ट. ही संपूर्ण कहाणी ब्रूनो या नऊ वषा|च्या मुलाच्या नजरेतून आपल्यापुढे उलगडत जाते.