The Hidden Hindu Part 1 (द हिडन हिंदू भाग १ )

"एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला. मर्त्य जगाचे नियम धुडकावणार्‍या ओमच्या अतर्क्य भूतकाळाच्या या साक्षात्कारामुळे तिथे असणारा प्रत्येक जण चक्रावून गेला. त्या टीमला असाही शोध लागला की, प्रत्येक युगातल्या इतर चिरंजीव व्यक्तींच्या शोधात ओम होता. ही विलक्षण गुपितं जगासमोर आली असती तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या धारणांना धक्का बसू शकला असता आणि येणारं भविष्य बदलून गेलं असतं. तर मग, हा ओम शास्त्री आहे तरी कोण? त्याला का पकडण्यात आलं? पृथ्वी त्याचा शोध का घेत आहे? चला तर मग, या उत्कंठावर्धक प्रवासात ओम शास्त्रीची गुपितं, पृथ्वीचा शोध आणि हिंदू पुराणकथांमधील इतर गूढ चिरंजीवांची साहसं यांचे आपणही सहप्रवासी होऊ यात.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category