-
Vednecha Krus(वेदनेचा क्रूस)
. लक्ष्मीकांत देशमुख यांची ही कादंबरी म्हणजे व्यक्तिचित्रात्मक साहित्यकृतीची एक अत्यंत सुरेखपणे घडवलेली तितकीच सुरेख प्रतिमा आहे. गेल्या पिढीतील प्रतिभाशाली चित्रपटकार गुरूदत्त यांच्या खऱ्याखुऱ्या जीवनातील विलक्षण घटनांवर कलाकृती निर्माण करणे, हे कोणत्याही लेखकाला शिवधनुष्य पेलण्यासारखे आव्हानात्मक वाटते, परंतु लक्ष्मीकांत देशमुख यांनी ते कठीण काम जातिवंत कलाकाराच्या जाणकारीने, जीवनाबद्दलच्या प्रगल्भ चिंतनाने एका उत्तुंग वाङ्मयीन पातळीवर नेले आहे. गुरूदत्त - गीता दत्त आणि वहिदा रहेमान या मानवी पातळीवर जन्म घेतलेल्या तीन अमानवी अद्भुत, कलेला जीवन मानणाऱ्या, मनस्वी -देहस्वी व्यक्तिमत्त्वांच्या अलौकिकपणाची ही कहाणी. प्रेम, प्रीती, भक्ती, आसक्ती, उत्कटता, असीम समर्पण आणि असीम तुटलेपण, मनाची आणि आत्म्याची तडफड, निर्मितीची आणि विसर्जनाची जीवघेणी तगमग आणि शेवटी एक अलौकिक अमर दुःखान्त ! या तीन कलाकारांची आणि त्यांच्या भोवतालच्या मानुष-अमानुष विश्वाची ही अविस्मरणीय कथा लक्ष्मीकांत देशमुख यांनी विलक्षण ताकदीने या कादंबरीमध्ये वाचकांसमोर सादर केली आहे. प्रत्यक्षातील प्रतिमा आणि लेखकाची प्रतिभा यांच्या कल्पनातीत निर्मितीचे हे हृदयंगम लेणे मराठी कादंबरीविश्वामध्ये अलौकिक ठरावे.
-
Freedom On Fire (फ्रीडम ऑन फायर)
या कथासंग्रहातील सातही कथा रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या वर्तमान युद्धाच्या पार्श्वभूमीवरील आहेत. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील अभिनेत्री / मॉडेल बार्बारा देशप्रेमाने भारून, युद्धात उतरून, रशिया-युक्रेन युद्धावर आधारित सिनेमाची निर्मिती करते; पण... ‘लव्ह, वॉर अॅन्ड...?’मधील घटस्फोटित अँजेलिना आणि सैनिक असलेल्या बोरिसचं वैवाहिक आयुष्य एक दिवसाचं ठरतं. बोरिस मारला जातो युद्धात; पण त्याचा वंश वाढत असतो अँजेलिनाच्या पोटात. मग अँजेलिनाच्या मनात पडतं महाकादंबरीचं बीज... ‘फ्रीडम ऑन फायर’मध्ये इगोर आणि सोफिया या पिता-पुत्रीच्या आंधळ्या रशियानिष्ठेला दिमित्री हा इगोरचाच मुलगा दाखवतो युक्रेनमधील विध्वंसाचा आरसा आणि मग सोफिया जाग आणू पाहते रशियनांना... ‘सच ए लाँग जर्नी’ मध्ये भारतीय शिवच्या मनात पाकिस्तानविषयी असलेल्या अढीमुळे माहजबिन ऊर्फ मून या पाकिस्तानी मुलीची दोस्ती स्वीकारायला तो तयार नसतो; पण युक्रेनमधील युद्धामुळे आपापल्या मायदेशी परतत असतानाच्या प्रवासात शिवचं मनपरिवर्तन होतं...रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनात उठलेल्या भावनिक/मानसिक संघर्षाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या उत्कट कथा THE RUSSIA-UKRAINE WAR HAS UNSETTLED THE ENTIRE WORLD. IN THIS LONG STRUGGLE, A SMALL COUNTRY LIKE UKRAINE IS PUTTING ALL THE EFFORTS. THESE STORIES HIGHLIGHT THE COURAGEOUS CITIZENS OF THIS COUNTRY AND THEIR STRUGGLE.
-
Gandhivadacha Chemical Locha Ani Itar Katha (गांधी
लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे. भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो. एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे. – आसाराम लोमटे
-
Savitrichya Garbhat Marlelya Leki (सावित्रीच्या गर
श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचा स्त्रीभ्रूणहत्या या विषयावरील आठ कथांचा हा थीम बेस्ड कथासंग्रह ज्वलंत प्रश्नाचे दाहक दर्शन घडवितो. स्त्रीभ्रूणहत्येची समस्या नवी नाही. वेगवेगळ्या समाजाने मुली नाहीशा कर[...]