Freedom On Fire (फ्रीडम ऑन फायर)

या कथासंग्रहातील सातही कथा रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या वर्तमान युद्धाच्या पार्श्वभूमीवरील आहेत. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील अभिनेत्री / मॉडेल बार्बारा देशप्रेमाने भारून, युद्धात उतरून, रशिया-युक्रेन युद्धावर आधारित सिनेमाची निर्मिती करते; पण... ‘लव्ह, वॉर अ‍ॅन्ड...?’मधील घटस्फोटित अँजेलिना आणि सैनिक असलेल्या बोरिसचं वैवाहिक आयुष्य एक दिवसाचं ठरतं. बोरिस मारला जातो युद्धात; पण त्याचा वंश वाढत असतो अँजेलिनाच्या पोटात. मग अँजेलिनाच्या मनात पडतं महाकादंबरीचं बीज... ‘फ्रीडम ऑन फायर’मध्ये इगोर आणि सोफिया या पिता-पुत्रीच्या आंधळ्या रशियानिष्ठेला दिमित्री हा इगोरचाच मुलगा दाखवतो युक्रेनमधील विध्वंसाचा आरसा आणि मग सोफिया जाग आणू पाहते रशियनांना... ‘सच ए लाँग जर्नी’ मध्ये भारतीय शिवच्या मनात पाकिस्तानविषयी असलेल्या अढीमुळे माहजबिन ऊर्फ मून या पाकिस्तानी मुलीची दोस्ती स्वीकारायला तो तयार नसतो; पण युक्रेनमधील युद्धामुळे आपापल्या मायदेशी परतत असतानाच्या प्रवासात शिवचं मनपरिवर्तन होतं...रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनात उठलेल्या भावनिक/मानसिक संघर्षाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या उत्कट कथा THE RUSSIA-UKRAINE WAR HAS UNSETTLED THE ENTIRE WORLD. IN THIS LONG STRUGGLE, A SMALL COUNTRY LIKE UKRAINE IS PUTTING ALL THE EFFORTS. THESE STORIES HIGHLIGHT THE COURAGEOUS CITIZENS OF THIS COUNTRY AND THEIR STRUGGLE.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category