-
Ka Karacha Shikun (का कराचं शिकून)
समाजातील वाड्या-वस्त्यांतील, झोपडपट्ट्यांतील, भटऱ्यासमाजातील हजारों मुले नापास होतात, यात त्यांचा दोष नाही; उलट ती नापास व्हावीत, ती शिकूच नयेत, अशा प्रकारऱ्याअभ्यासक्रमाची रचना, शाळांची वेळापत्रके, शिक्षणखात्याची व मास्तरांची क्लिष्ट मानसिकता, यामुळे आपोआपच भटक्या-विमुक्त जमाती मागे पडल्या. अज्ञान, व्यावसायिक शिक्षणावर फारसा भर नाही. तसेच युती सरकार आल्यावर बहुजन समाजाऱ्याशिक्षणालाच ग्रहण लागलेलं. केवळ आम जनतेऱ्याकल्याणाचा घोष, वरवरऱ्यासर्व कल्याणकारी योजना, त्यामुळे भटक्या-विमुक्तांऱ्यासर्व पिऱ्याशिक्षणाची हेळसांड करतच नरकात गेल्या; माध्यमिक शिक्षण मोफत झालं, तरी भटक्यांऱ्याशिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस कठीणच होत गेला. गरिबातऱ्यागरिबालाही शिक्षणाचं महत्त्व कळलं; पण आजही या व्यवस्थेबद्दल लोक अत्यंत असमाधानी आहेत. कारण शिक्षणासारऱ्याप्रभावी साधनाचाही शोषणाचे हत्यार म्हणून राजकीय लोक उपयोग करतात. शिकून व न शिकूनही आमऱ्यापरिस्थितीत काहीच फरक पडत नाही...या निराशाजनक परिस्थितीत...सर्वसामान्यांना व भटक्या-विमुक्तांनाही रोज नऱ्याआव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे विमुक्त जातींनाच नाही, तर इतर सर्वांनाच ‘का कराचं शिकून’? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही, हेच खरं.
-
Yashvantrao Chavan: Aathavani-Akhyayika (यशवंतराव
यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखन. लक्ष्मण माने यांनी या पुस्तकातून-पत्ररूपात सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आहे. लोकनेते यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे. यात लक्ष्मण मानेंना बालपणापासूनच यशवंतरावांबद्दल कसे कुतूहल होते, इथपासून ते यशवंतरावांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास या कालखंडाचा सजगतेने, संवेदनशीलपणे केलेला अभ्यास व मोठा कालपट माने वाचकांसमोर मांडतात. यशवंतरावांचा जनसंपर्क, लोकांबद्दलचे प्रेम, पक्षनिष्ठा नवनवीन योजना राबवण्याची त्यांच्या मनात असलेली उर्मी, साहित्य,कला, संगीतप्रेम या सर्वांचा ऊहापोह या पुस्तकात माने यांनी घेतला आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास. हे सर्व असूनही खऱ्या अर्थाने लोकांशी असलेली आपुलकीची नाळ व कवीमन अखेरपर्यंत ठेवून सतत जमिनीवर पाय असलेला हा अवलिया. रूढार्थाने यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या हयातीतच आख्यायिका बनून राहिले होते, यात तीळमात्रही शंका नाही. त्या सगळ्या गोष्टीचा घेतलेला सामाजिक, राजकीय व मानवतेच्या दृष्टीने घेतला वेध म्हणजेच हे पुस्तक होय !
-
Vimuktayan (विमुक्तायन)
‘विमुक्तायन’ हे लक्ष्मण माने लिखित संशोधनात्मक पुस्तक असून, महाराष्ट्रातील भटक्या व विमुवत जमातींचा चिकित्सक पध्दतीने केलेला हा अभ्यास. लेखकाने पहिल्या प्रकरणातून विमुक्त जमातींचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडला आहे. दुसर्या प्रकरणातून भटक्या गुन्हेगार जमातींचा जीवन संघर्ष, तंटे-बखेडे, सामाजिक जीवनाचा धांडोळा घेतला आहे. तिसर्या प्रकरणांतून महाराष्ट्रातील विमुक्त जमातींची सामाजिक व आर्थिक स्थिती,जात परंपरा,विवाह,विधवांचे पुनर्विवाह,जातपंचायत इ.चा ऊहापोह केला आहे, शेवटच्या व चौथ्या प्रकरणातून-भटक्या-विमुक्तांसाठी शासनाने केलेल्या उपाययोजना,त्यांचे मनाचा थरकाप उडविणारे,परिघाबाहेरचे जीवन, जातपंचायतींचे वाढते प्रस्थ, परिशिष्टे, नकाशे, प्रत्येक जात व पोटजातींच्या माहितीचे टेबल इ.माहिती सखोल अभ्यास करून सुस्पष्टपणे दिली आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे,‘काटेरी कुंपणा’तील रक्तबंबाळ झालेल्या जीवांची मुक्तता म्हणावी असेच. म्हणूनच मानवतेच्या कार्याचा सजगतेने,संवेदनशीलपणे केलेला हा अभ्यास म्हणजे श्रेष्ठ पुरस्कार ठरणारे, ‘विमुक्तायन’ हे पुस्तक होय
-
Khel Sadetin Takkyancha (खेळ साडेतीन टक्क्यांचा)
‘उपरा`कार लक्ष्मण माने चळवळीतील विचारवंत. माने यांनी वेळोवेळी समजत जाणवणारे प्रश्न आणि समस्या यावर भाष्य असणारे स्फुटलेखन प्रसंगानुरूप केलेले आहे. तत्कालीन समस्या आणि प्रश्न यांना लेखनाच्या माध्यमातून वाचा फोडून ते प्रश्न लोकांसमोर आणायचे काम केलेले आहे. `खेळ साडेतीन टक्क्यांचा` या लेखसंग्रहात अशाच स्वरूपातील लेखांचे संकलन केलेले आहे. १९९५ च्या दरम्यान लक्ष्मण माने हे ‘बंद दरवाजा` नावाचे साप्ताहिक चालवत असत. सरकारी धोरणे, सामाजिक प्रश्न, साहित्य-संस्कृती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी-वंचित घटकांसाठीचे प्रश्न या साप्ताहिकातून त्यांनी मांडले. ते प्रश्न लोकांसमोर मांडण्याचे काम हे या लिखाणातून झालेले आपल्याला पाहायला मिळते. हे लिखाण साधारणतः २५ वर्षांपूर्वीचे असले तरीही आजच्या काळातही तेच मुद्दे आणि प्रश्न तसेच असल्याचे जाणवते त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय आणि चिंतनीय अशा प्रकारात मोडते.
-
Palavarcha Jag (पालावरचं जग)
‘पालावरचं जग’ या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडितांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेखांतून अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांचं अमानवी जगणं, अन्याय, दुःख-दैन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट झालेल्या समाजाचा उद्धार व संघर्षगाथा-‘यल्लपाचा चंग’मधून दिसते. ‘मरण येत नाही, म्हणून जगायचं!’ हे पालावरचं बेभरवशाचं हीन व शोषित जगणं, भटक्या-विमुक्तांचं स्वत्वं-स्वाभिमान हिरावून घेणारं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, भराडी-कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, टकारी भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाजाने हीन व उपरं ठरवलेलं. या समाजाचा वाली कोण? कधी जाग येणार या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठीचा तीव्र संघर्ष, चळवळ व आंदोलने लेखकाने व कार्यकर्त्यांनी छेडलेली, तुरुंगवास पत्करलेला. त्यांच्या स्वातंत्र्याचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. म्हणूनच माणुसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवाल्यांच्या दु:खाचा, मरणानंतरही जात आडवी, फाटलेलं आभाळ या लेखांतून मानवी जीवनातील दारिद्र्य, लाचारी, त्यांच्या समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा फोडतो. गुन्हेगारीचा शाप मागं लेवून जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्याच दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला अनिष्ट चालीरीति-रूढीं-परंपरांचा शाप. त्यामुळे गावगाडा उचकटून लाचारांच्या/बेरोजगारांच्या फौजा तयार झालेल्या. सत्यानास, अन्नानदशा व कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का जगणं नकोसं करतो; शिवाय स्त्री जातीचे धिंडवडे, अन्यायाची परिसीमा-बलात्काराने पोखरलेलं हीन-दीन जगणं, दहशत, अपमान व स्त्री जन्माला मिळालेला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी ‘उपरा`मधूनही या दु:खाला वाचा फोडली आहेच. व्यासपीठावरूनही भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखकाने मांडले ते ‘बंद दरवाजा` या नावाने. लेखकाने सच्च्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून हे ‘पालावरचं जग’ आपल्यासमोर मांडलंय, त्यातील धगधगते दाहक सत्य काळजाला पीळ पाडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, लेखकाने त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांची स्थितिगती जाणून घेऊन, त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे... मानवी हक्क व न्याय यांपासून भटका-विमुक्त समाज वंचित राहू नये, हीच तळमळ या सर्व लेखनातून स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिककार्यांतून चळवळींना बळ देऊन मानवी उन्नत्ती व माणुसकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत जगणं भटक्या-विमुक्तांचं असावं, अज्ञानाला थारा नसावा, हाच लेखकाला ध्यास आहे. म्हणूनच या अत्याचाराच्या कहाण्या, मसणजोग्यांचं अपरिमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, वहिवाटीसाठीची लढाई, आभाळाएवढ्या छत्रपतींचा आदर्श लेखक लक्ष्मण माने समाजापुढे उभा करतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एके दिवशी आकार प्राप्त होईल, हा दुर्दम्य विश्वास लेखकाला आहे. म्हणूनच ‘पालावरचं जग’ म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी वास्तव म्हणता येईल.
-
Bhatkyacha Bharud (भटक्याचं भारुड )
राज्यपालांचे नामनियुक्त सभासद म्हणून लक्ष्मण माने १९९० ते १९९६ या काळात महाराष्ट्रविधान परिषदेत कार्यरत होते. त्यावेळी निमित्ता-निमित्ताने त्यांनी अनेक भाषणे केली, प्रश्नविचारले, प्रस्ताव मांडले, त्यातील निवडकसाहित्य या पुस्तकात संग्रहित केले आहे. एक संवेदनशील लेखक आणि तळमळीचा व तडफेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या या मतप्रदर्शनाला आगळे मोल आहे. त्यांचा मुख्यरोख भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना राखीव जागा व सवलतीहा आहे आणि त्याचमुळे राज्यशासनातील वर्णव्यवस्था व नोकरशाहीची अनास्था यामुळे ते सतत क्षुब्ध आहेत. त्यांचा हा क्षोभ स्वाभाविकच तेजस्वी भाषेतून व्यक्त होतो तेव्हा...
-
Udhavast (उद्ध्वस्त )
दारिद्रय, निरक्षरता, बेकारी, बिमारी, बकालपणा यांनी माणसं गंजून; वैभवाच्या शिखरांना सीमा नाही आणि दारिद्र्याच्या तळाला अंत नाही. घर घरात राहिलेलं नाही, माणूस माणसातनं हरपलाय आणि घराघरातील माऊली घराच्या तळाला गाडली जात आहे... हे वर्णन आहे लक्ष्मण माने यांनी केलेल्या आजच्या समाजस्थितीचं. त्यांना जगाविषयी कुतूहल आहे, मनुष्यजीवनाविषयी आस्था व प्रेम आहे; परंतू त्यांचे मान पीडलेले आहे भटक्या- विमुक्तांच्या, आदिवासींच्या, पददलितांच्या दुःख वेदनांनी. त्यांच्यातल्या कार्यकर्ता अशा स्थितीतही परिवर्तनाची लढाई लढू पाहात आहे आणि त्यांच्यातील लेखकाचं मन आक्रोशत आहे. 'या दुःखाला वाचा फोडता आली तर पाहावी' म्हणून त्यांनी मांडलेला हा कथांचा प्रपंच...
-
Palavarach Jag ( पालावरचं जग )
भटक्या आणि विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची स्थितिगती आणि त्यांचे प्रश्न लेखकाने या पुस्तकात भेदकपणे मांडले आहेत.
-
Upara ( उपरा )
जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं, ते-ते तसंच लिहित गेलो. पुन्हा एकदा तेच जगणं जगत गेलो. कुणावर दोषारोप ठेवावा हा हेतू कधीच नव्हता. अनेकदा मोह होऊनही स्वत:ला सावरत गेलो. काही ठिकाणी काही व्यक्तींची नावे बदलली ती नाइलाज म्हणूनच. या पलीकडे माझ्या पदरचं काही नाही. या पुस्तकानं भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या प्रश्नावर सामाजिक मंथन सुरू झालं, भटक्यांचे प्रश्न सामाजिक चर्चेचा विषय झाला आणि त्यांच्यासाठी काम करणार्या मंडळींच्या कामाला चालना मिळाली तर पुस्तक लिहिण्याचे श्रम सार्थकी लागले असे मी समजीन. पिढ्यान्पिढ्या बिर्हाड पाठीवर घेऊन गाढवाचं जिणं जगणार्या मंडळींच्या वेदना समाज समजावून घेऊ शकला तरी खुप झालं.
-
Khel Sadeteen Takkyancha (खेळ साडेतीन टक्क्यांचा)
कोणत्या माणसांच्या संस्कृतीबद्दल आपण बोलत असतो ? कोणाच्या साहित्यकलांबद्दल आपण बोलत असतो ? मूठभर मंडळी भरल्या पोटाने आपल्याच जगण्या-भोगण्याचे चित्रण करत राहणार. त्यात इतरांना गौरव वाटावा असे काय आहे ? त्यात त्यांनी अभिमान बाळगावा असे तरी काय आहे ?