-
Velecha Niyojan Kara Tanavmukta Vha (वेळेचे नियोजन
वेळेचे नियोजन करा तणावमुक्त राहा’ हे लेखिका रिटा एमेट यांचे सुंदर पुस्तक . पुढील आठ प्रकरणांतून त्यांनी दिवसेंदिवस वाढणाऱ्या तणावपूर्ण जीवनाचा अभ्यास करून, त्यावरील उपाय आणि मानवी जीवनाचा खरा आनंद व उत्कर्ष शोधला आहे. ८ प्रकरणांतून उच्च पदावर कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था-त्यांची ध्येय-धोरणे, कार्यपध्दती तसेच सामान्यांचे दैनंदिन प्रश्न, यांचा मनोविश्लेषणात्मक दृष्टीने लेखिकेने अभ्यास केला आहे.
-
How We Got to Now (हाऊ वी गॉट टू नाऊ)
हाऊ वी गॉट टू नाऊ या सचित्र पुस्तकात स्टीव्हन जॉन्सन यांनी आपल्या दैनंदीन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग असलेल्या सहा अगदी साध्या गोष्टींचा (चष्मा, लंबकाचे घड्याळ, विजेचा दिवा, भूमिगत गटारे, टेलिफोन, विजेचा दिवा) शोध कसा लागला आणि त्यामुळे एकूण जीवनावर किती दूरगामी आणि खोल परिणाम झाले यांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने सांगितला आहे. अनेक भिन्न क्षेत्रातील वरवर असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये (सूक्ष्मदर्शक यंत्र, ग्लोबल पोझीशनींग, मायक्रोचीप, न्युक्लीय एकीकरण, मानवी स्थलांतर, स्त्रीभृणहत्या) कसा परस्पर संबंध असतो आणि त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम कसा अनपेक्षित असतो हे त्यांनी सांगितल्यावर आपल्याला कळते आणि त्याने वाचक अचंबित झाल्या वाचून रहात नाही. वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या खास शैलीमुळे ते जगभर लोकप्रिय आहेत.
-
The Profet murderes (द प्रॉफेट मर्डर)
इस्तंबूलमध्ये काहीतरी विलक्षण घडत आहे. एक पिसाट खुनी मोकाट सुटला आहे आणि शहरातील ट्रान्सवस्टाईटचे एकापाठोपाठ एक खून होत चालले आहेत.प्रत्येक खुनानंतर परिस्थितीचा गुंता वाढत चाललाय. या कथानकाचा नायक हा दिवस संगणक-तज्ञ व रात्री ट्रान्सवस्टाईट असे दुहेरी आयुष्य जगत असतो. दिवस मावल्यावर ओठांना लिपस्टिक लावून स्त्री-वेशात तो या खुनाचा शोध घ्यायचं ठरवतो खर; पण खुनाच्या मागे असलेल्या माथेफिरू शक्तींचा सामना करणं वाटत तेवढं सोपं नसतं. हे प्रकरण अंगावर शेकण्याची वेळ येते, तेव्हा कथनायिकेच्या रूपातील हा कथानायक त्यातून मोठ्या चातुर्याने मार्ग काढतो.
-
Moulin Rouge (मुलाँ रूज)
"मुलॉं रूज' ही हेन्री या फ्रान्समधल्या एका चित्रकाराची कहाणी आहे. फ्रान्समधील तुलूझ लोत्रेक या प्रख्यात घराण्यात जन्मलेला हेन्री ऐन शैशवाच्या उंबरठ्यावर एका विचित्र आजाराची शिकार होतो. त्यामुळे त्याच्या कंबरेखालील शरीराची वाढ खुंटते. आजारपणामुळे बिछान्यावर खिळलेल्या मुलाचे हेंगाडे रूप पाहून वडील तोंड फिरवून निघून जातात, तर आई एकुलत्या एक मुलाच्या भवितव्याच्या चिंतेने अश्रू ढाळीत बसते. अशा अवस्थेतील हेन्रीची चित्रकार बनण्याची इच्छा राजघराण्याच्या लौकिकाला साजेशी नसली, तरी हट्टाने तो चित्रकलेचे शिक्षण घेण्याचे ठरवतो. त्यासाठी तो पॅरिसच्या गावकुसाबाहेरील मोंमार्त्र या वस्तीत राहायला जातो. आपल्या तोलामोलाच्या राजघराण्याच्या जगापेक्षा मोंमार्त्रमधील कष्टाचे, मोलमजुरीचे काम करणारे सामान्य लोक, सर्कस व नाटकातील कलाकार या विश्वात तो समरसून रममाण होतो. आपल्या सभोवतीच्या रंगिल्या नशाजीवनाची त्याने केलेली पेंटिंग्ज आणि पोस्टर्स यांनी तुलूझ लोत्रेकला आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहात स्वतःचे स्थान मिळवून दिले.