Use Of Force (यूज ऑफ फोर्स)
जगातील सर्वांत निष्ठुर आतंकवाद्यांकडून अमेरिकेला एक भयंकर संदेश पाठवला जातो - तुम्ही कुठेही सुरक्षित नाही आणि आतंकवादविरोधी कारवाईत सामील झालेला माजी सील ऑपरेिटव्ह स्कॉट हार्वथकडून त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळतं. भूमध्य समुद्रावर वादळ घोंघावत असताना इटालियन तटरक्षक दलाला एक बोट संकटात सापडल्याचा संदेश येतो. काही दिवसांनी एका बुडून मेलेल्या माणसाचा मृतदेह किनार्यावर वाहून येतो. तो मृतदेह सर्व देश गेल्या तीन वर्षांपासून शोधत असलेल्या एका संशयित दहशतवाद्याचा असतो. त्या माणसाच्या नावाने सीआयएमध्ये धावाधाव सुरू होते. तो कुठे चालला होता? त्याची काय योजना होती? जगातल्या गुप्तहेर संस्थांचा त्या उन्हाळ्यात युरोप-अमेरिकेत एक जबरदस्त आतंकवादी हल्ला होणार आहे असा अंदाज होता. त्याच्याशी त्या मृतदेहाचा संबंध असेल काय? हृदयाचे ठोके वाढवणारी साहसे, मोहिनी घालणार्या व्यक्तिरेखा आणि चक्रावून टाकणार्या कलाटण्या.