Moulin Rouge (मुलाँ रूज)

By (author) Pierre la Mure / Jayant Gune Publisher Lokwangmay Gruh

"मुलॉं रूज' ही हेन्री या फ्रान्समधल्या एका चित्रकाराची कहाणी आहे. फ्रान्समधील तुलूझ लोत्रेक या प्रख्यात घराण्यात जन्मलेला हेन्री ऐन शैशवाच्या उंबरठ्यावर एका विचित्र आजाराची शिकार होतो. त्यामुळे त्याच्या कंबरेखालील शरीराची वाढ खुंटते. आजारपणामुळे बिछान्यावर खिळलेल्या मुलाचे हेंगाडे रूप पाहून वडील तोंड फिरवून निघून जातात, तर आई एकुलत्या एक मुलाच्या भवितव्याच्या चिंतेने अश्रू ढाळीत बसते. अशा अवस्थेतील हेन्रीची चित्रकार बनण्याची इच्छा राजघराण्याच्या लौकिकाला साजेशी नसली, तरी हट्टाने तो चित्रकलेचे शिक्षण घेण्याचे ठरवतो. त्यासाठी तो पॅरिसच्या गावकुसाबाहेरील मोंमार्त्र या वस्तीत राहायला जातो. आपल्या तोलामोलाच्या राजघराण्याच्या जगापेक्षा मोंमार्त्रमधील कष्टाचे, मोलमजुरीचे काम करणारे सामान्य लोक, सर्कस व नाटकातील कलाकार या विश्‍वात तो समरसून रममाण होतो. आपल्या सभोवतीच्या रंगिल्या नशाजीवनाची त्याने केलेली पेंटिंग्ज आणि पोस्टर्स यांनी तुलूझ लोत्रेकला आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहात स्वतःचे स्थान मिळवून दिले.

Book Details

ADD TO BAG