-
Shetkari Jevha Jaga Hoto (शेतकरी जेव्हा जागा होतो)
या पुस्तकाचा नायक आहे पुंजाबाबा गोवर्धने. स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या भात उत्पादक शेतकरयांच्या लढ्याचा सेनापती. पुंजाबाबांचं हे चरित्र वाचत असताना मला अनेकदा असं वाटून गेलं. की पुंजाबाबांचं नेतृत्व माझ्यापेक्षाही अधिक गुणवत्तापूर्ण आणि कष्टाळू असं होतं. पुंजाबाबांची पार्श्वभूमी खेडेगावातील अशिक्षित शेतकऱ्याची होती,तरीही त्यांनी विचाराची मोठी झेप घेतली आणि अलौकिक कार्य करून ठेवलं. पुंजाबाबांचं हे चरित्र म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या एका पर्वाचा इतिहासच आहे!
-
Kunya Ekachi Dharangatha (कुण्या एकाची धरणगाथा)
नाशिक जिल्ह्यातला बागलाण तालुक्याचा परिसर हा वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेला भाग. इथल्याच गोपाळ मोरे नावाच्या गरीब शेतक-याने हा भाग पाण्यात भिजवण्याची इच्छा मनात धरली आणि तिचा चिवट वृत्तीने पाठपुरावाही केला. या इच्छेपोटी आमदारापासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचा पिच्छा पुरवला...आणि शेवटी आपल्या दुर्दम्य आकांक्षा आणि परिश्रमांनी धरण मिळवलंच. त्याची ही गोष्ट..इतिहासातले तुटक धागेदोरे जुळवत पन्नास वर्षांच्या अज्ञातवासातून बाहेर काढलेली...