-
Destination (डेस्टिनेशन)
सचिवालयात काम करणारी दीपा सापडली आहे हाजी बिलाल नावाच्या एका क्रूर दहशतवाद्याच्या जाळ्यात...दीपाचा खोटा पासपोर्ट तयार करून तिच्यामार्फत इराकला कोकेन पाठवण्याची योजना आहे बिलालची...ते कोकेन माणसाला उत्तेजित करणारं आहे...महावीर नावाचा गुप्तहेर पोलिसांना मदत करतो दीपापर्यंत पोचण्यात...काय असते त्याची योजना?...वाचा ‘षड्यंत्र’ या कथेत... एका हवेलीत एक गुप्त खजिना आहे...त्याच्या किल्ल्या आहेत एका संग्रहालयात... तबरेज आणि खतिब या हवेलीचा मालक अल अमिन याच्या सांगण्यावरून त्या किल्ल्या चोरतात आणि अमिनच्या सुपूर्द करतात...दरम्यान, डीके नावाचा एक नामवंत उद्योजक मॉलमधील दोन मौल्यवान घड्याळं चोरतो आणि चोरी उघडकीला आल्यावर आत्महत्या करतो...अल अमिन आणि एका न्यूरो सर्जनचा डीकेंबाबत घडलेल्या घटनेशी संबंध आहे...काय आहे तो संबंध? किल्ल्यांची चोरी आणि डीकेंची आत्महत्या यातील धागेदोरे शोधत इन्स्पेक्टर धनंजय अल अमिनपर्यंत कसा पोचतो?... वाचा ‘मृगजळ’ ही कथा...दहशतवाद, गुन्हेगारांचं अंगावर शहारे आणणारं क्रौर्य आणि पोलीस, गुप्तहेरांचं असीम शौर्य अशा संघर्ष नाट्यातून रंगलेल्या थरारक कथांचा संग्रह
-
Baichi Gosht (बाईची गोष्ट)
क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी षडरिपुंमधे दशांगुळं मातब्बर ठरते कामवासना! अन्य वासनांचा अंत शक्य आहे पण कामवासना मात्र अंतहीन! कामोपभोग घेणं हीच पुरुषप्राण्याची आदिम, उन्मत्त लालसा. कामवासना ही जशी सर्जनशील तशी विनाशकारीसुद्धा! कधी प्रेमरज्जू बांधते तर कधी सूडभावना चेतवते. तिची अनंत रुपं थक्क करणारी! ती स्वत:च्या अनावर प्रपातात पुरुषाला आणि क्वचित स्त्रीलासुद्धा अध:पतित करीत पशुत्वाच्या क्रूर पातळीला नेऊन ठेवते. कामवासनेच्या नानाविध रुपांना बळी पडलेल्या, कामशरणागत झालेल्या पात्रांच्या या श्रुंगारकथा समाजाला ‘सेक्स`च्या प्रदूषणाचा गंभीर विचार करायला भाग पाडतील अशाच आहेत.
-
Katlatil Jhare (कातळातील झरे)
सार्वत्रिक धारणा...पुरुष म्हणजे पाषाण, पुरुष कातळकठोर पण... भगव्या कपड्यातील असो कि सामान्य-शृंगारातील आदिम प्रेरणा खेचतेच पुरुषाला स्त्रीकडे. 'ती' चा सहभाग अनिवार्य,पण वाद्जनक. त्यातूनच कातळकडे दुभांगतात...' चिरफळतात, सुप्त व्यथांचे झरे उसळतात...,विखुरतात, छिन्नविछिन्न होत तृशार्तावस्थेत आटतात. कातळातल्या शुष्क होत जाणारया झऱ्यांच्या अर्थात पुरुषांच्या अवघे आयुष्य उधळून लावणाऱ्या व्यथा.