Destination (डेस्टिनेशन)
सचिवालयात काम करणारी दीपा सापडली आहे हाजी बिलाल नावाच्या एका क्रूर दहशतवाद्याच्या जाळ्यात...दीपाचा खोटा पासपोर्ट तयार करून तिच्यामार्फत इराकला कोकेन पाठवण्याची योजना आहे बिलालची...ते कोकेन माणसाला उत्तेजित करणारं आहे...महावीर नावाचा गुप्तहेर पोलिसांना मदत करतो दीपापर्यंत पोचण्यात...काय असते त्याची योजना?...वाचा ‘षड्यंत्र’ या कथेत... एका हवेलीत एक गुप्त खजिना आहे...त्याच्या किल्ल्या आहेत एका संग्रहालयात... तबरेज आणि खतिब या हवेलीचा मालक अल अमिन याच्या सांगण्यावरून त्या किल्ल्या चोरतात आणि अमिनच्या सुपूर्द करतात...दरम्यान, डीके नावाचा एक नामवंत उद्योजक मॉलमधील दोन मौल्यवान घड्याळं चोरतो आणि चोरी उघडकीला आल्यावर आत्महत्या करतो...अल अमिन आणि एका न्यूरो सर्जनचा डीकेंबाबत घडलेल्या घटनेशी संबंध आहे...काय आहे तो संबंध? किल्ल्यांची चोरी आणि डीकेंची आत्महत्या यातील धागेदोरे शोधत इन्स्पेक्टर धनंजय अल अमिनपर्यंत कसा पोचतो?... वाचा ‘मृगजळ’ ही कथा...दहशतवाद, गुन्हेगारांचं अंगावर शहारे आणणारं क्रौर्य आणि पोलीस, गुप्तहेरांचं असीम शौर्य अशा संघर्ष नाट्यातून रंगलेल्या थरारक कथांचा संग्रह