Epitaph (एपिटाफ)
महासत्तेतील संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणताना सिमॉन व्हिटकोरने प्राण गमावलाय; पण जाता-जाता एक पुरावा ठेवलाय त्याने. त्याचा जिवलग मित्र कसा पोचतो त्या पुराव्यापर्यंत आणि भ्रष्टाचार्यांचं बिंग कसं फोडतो, याचं उत्कंठावर्धक चित्रण आहे ‘एपिटाफ’ या कथेत. ‘अपहरण’ कथेतील सुधीर हा निवृत्त पोलीस अधिकारी. त्याच्या सुंदर, तरुण मुलीचं, ज्योतीचं अपहरण होतं. सुधीर तपासाला निघतो. कोणी केलेलं असतं ज्योतीचं अपहरण? सापडते का ती? भारतातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी, मानवतेला काळिमा फासणारा ‘पॉप्स डिसीजन’ हा प्रोजेक्ट राबवताहेत स्मिथ आणि थापर. त्यांना शह देण्यासाठी हाय प्रोफाइल सेक्स वर्कर अवंती, एक मंत्री आणि अन्य आखतात एक योजना. सफल होते का त्यांची योजना? वाचा ‘पडद्यामागे’ या कथेत. ‘अपहृत’ कथेत दोन संघटनांच्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराचं अपहरण झालंय. काय होतं पुढे? वास्तवतेच्या जवळ जाणार्या उत्कंठावर्धक कथा.