Idli Orchid Aani Me (इडली ऑर्किड आणि मी)
कामत ग्रुप'चे सर्वेसर्वा डॉ. विठ्ठल कामत यांचं हे पुस्तक उद्योजक बनण्याची प्रेरणा देतं. सर्वसाधारण खानपानवाला, ते ऑर्कीड'सारख्या पंचतारांकित हॉटेलचा मालक हा त्यांचा प्रवास या पुस्तकातून वाचक अनुभवतो. १९५० साली कामत यांच्या वडिलांनी चर्चगेट रेल्वेस्टेशनपाशी सत्कार हे हॉटेल सुरू केलं. आईनं दागिने गहाण ठेवून हे होटेल उभारायला मदत केली. याच हॉटेलनं पुढे इतिहास घडविला. 'सत्कार'पासून सुरु झालेला प्रवास दिमाखदार ठरला. 'पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल'चा मानही त्यांच्या हॉटेलला मिळाला. मराठी माणसाला उद्योजक होता येत नाही, ही उक्ती खोटी ठरवणारं कामत यांचं हे आत्मचरित्रपर लेखन वाचावं असेच आहे.