Mazi Janmakahani (माझी जन्मकहाणी)
आयान हिरसी अली - एक सुंदर वृत्तीची इस्लामधार्मीय स्त्री … आईवडिलांकडून झुंझार वृतीच बाळकडू मिळालेली आयन वडिलांच्या पसंतीच्या तरुणाशी लग्न करायला नकार देते . तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहाला ती जीवाच्या आकांताने विरोध करते तो हॉलंड मधील निर्वासितांच्या छावणीत . मुस्लिमांच्या धर्म पंचायतीसमोर ती धीटपणे सांगते " मला हा निकाह मंजूर नाही . कारण माझे मन तो मान्य करत नाही ." या तिच्या निर्भीड जवाबाला धर्म मार्तंड थोर मनाने स्विकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते . हॉलंड मध्ये राज्य शास्त्र विषयातील पदवी उत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व … आयान चा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश . तिच्या दुर्दैवाने तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्व रद्द होण्याची भीती समोर ठाकते . त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयान न अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरावादी इस्लामने स्त्रीच्या तनामनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इंफिडेल म्हणजेच माझी जन्मकहाणी . तिने अशा धर्माचा त्याग केला तो तिच्या समाजातील ५०% लोकांना कुठलही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही . अशा ह्या झुंझार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येकानेच हे पुस्तक वाचायला हवे .