Mi, Sampat Pal, Gulabi Sareewali Ranaragini
मी आवरून तयार होतीये, यांत्रिकपणे माझ्या हालचाली घडतायत. मी माझ्या छोट्याश्या अंधाऱ्या खोलीत आहे. गेल्या २ वर्षांपासून हे माझं मुख्य कार्यालय आहे. मी केसांचा अंबाडा वळते, मग गुलाबी साडीची घडी उघडून ती नेसते. बाहेर जमलेल्या गर्दीचा गलका केंव्हापासूनच कानावर पडतोय. त्या सगळ्याजणी युद्धासाठी सज्ज आहेत. माझ्याकडून एक इशारा मिळायचा अवकाश, त्या आणखीन मोठ्यानं गर्जत उसळून उठतील! मी दारापाशी येताच आभाळाच्या दिशेने उंचावलेल्या काठ्यांचं जंगल माझ्या स्वागतासाठी उत्साही आवाजात गगनभेदी गर्जना करतं : " गुलाबी गँग! गुलाबी गँग!"