Dhwaj Vijayacha ( ध्वज विजयाचा )
कारगिलचा विजय हा प्रत्येक भारतीयाचा विजय. या विजयाचे शिल्पकार सार्यांच्या दृष्टीतून हिरो. लढताना स्फुरण चढ़तं आणि ओठातून शब्द येतात, 'जय गोरखाली!' 'जय भवानी' 'सत् श्री अकाल!' किंवा 'हर हर महादेव!' जवान कोणत्याही रेजीमेंटचा असो, अधिकारी कोणत्याही रॅकचा असो, युद्भूमीवर लक्ष्य एकच-समोरचा शत्रु! त्याला मारलं नाही तर तो मला मारेल ही एकच भावना, रमच्या घोटाबरोबर सार्या शरीरभर वाहत असलेली. जवान आणि अधिकारी, देह अनेक मन अशा विलक्षण उर्मीत विजयपथावर चालत असतात. विजयश्रीने माळ घातल्यावर ही धुंदी हलके हलके उतरायला लागते. मनावरचा ताण ओसरतो. क्रौर्याची सीमा पायरीपायरीने कमी व्हायला लागते. युद्धभूमिवरच्या एकाच भावनेला मग हलके हलके पदर सुटायला लागतात. तिथे झालेल्या पडझडीची-मोड़तोडीची आणि कमावलेल्या-गमावलेल्या सार्यांचीच उजळणी करणार्या या कथा!