Mi Suresh Khare (मी सुरेश खरे)
नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, नाटयप्रशिक्षक, साहित्यिक - सांस्कृतिक कार्यक्रम संयोजक, विमा व्यवसायातील अधिकारी अशा अनेक नात्यांनी श्री. सुरेश खरे पन्नास वर्षांहून अधिक काळ साहित्यिक - सांस्कृतिक क्षेत्रात वावरत आले आहेत. स्वतःची अशी मुद्रा या उमद्या माणसाने रसिक मनात उमटवली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील धडपडया मुलगा ते कर्तृत्वसिद्ध व्यक्तिमहत्व असा हा प्रवास. अनेक ताणतणावांनी, नाटयपूर्ण घटनांनी भरलेला. मानवी मनाचे अनेक पैलू दाखविणारा. त्याची ही प्रांजळ, रसपूर्ण आणि प्रेरक आत्मकहाणी