Jeevan Fanda(जीवन फंडा)
शिखरावर पोहचण्याचा मार्ग... जीवनात संघर्ष आहे. कमालीची स्पर्धा आहे. या सगळ्यातुन मार्ग काढीत आपल्याला आनंद मिळवाय़ाचा आसतो. त्यासाठी गरज आहे सकरात्मक विचारांची. प्र्यतेक गोष्ट आपल्या मनाप्रमाने घडेलच असे नाही. चढ़उतार, भरती- आहोटी सुरूच असते. जीवनात आणि व्यवसायातील स्पर्धेमुळॆ अनेकदा निराशेच्या सावल्या मनात वादळ निर्माण करतात. मुळ ध्येयापासून आपण दूर जात आहोत ही भीती छळते व विजयाचा मार्ग आपण स्वत:च हरवून बसतो. 'जीवनफंडा ' आहे, आनंदी, सकारात्मक, तनावमुक्त व यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारी हमखास 'गुरुकिल्ली'. निराशेच्या सावल्या धूसर करून यशस्वी जीवनाचा प्रकाश दाखवणारॆ शिखर गठान्यासाठी सकारात्मक, पायरीचे महत्व संगणारा, व्यावसायिक आणि भावनिक नात्याना नवा आधार देणारा हा जीवनफंडा सांगितला आहे- प्रख्यात मॅनेजमेंट तज्ञ, कॉर्पोरेट ट्रेनर व सिद्धहस्त लेखिका स्वप्ना पाटकर यांनी.