Yashacha Kanmantra (यशाचा कानमंत्र)
अमर चित्रकथा’सारखा स्तुत्य उपक्रम करणार्या अनंत पै ह्यांचे हे लेखन आहे. त्या कामात व्यग्र असतानाच त्यांच्या लक्षात आले की मुलांच्या मनात यशइच्छा असतेच पण काही वेळ त्यांची ह्यासाठीची मार्गक्रमणा चुकीची होत असते, काही वेळा त्यांना समजून घेण्यातच चूक झालेली असते न् त्यामुळे ते भरकटूही लागतात आणि बर्याचदा कमी पडतो तो त्यांचा आत्मविश्वास - तर ह्या सार्यावर मात करून यश कसे मिळवावे ह्याचेच हे मार्गदर्शन - "ध्येयानं आमूलाग्र परिवर्तन घडतं", "आत्मसंयमाने इच्छाशक्तीचा विकास", "निरीक्षणाने,श्रवणाने सुप्त सामर्थ्य जागृत करा", "ताणमुक्त व्हा आणि स्वत:ला नव्यानं घडवा" अशी पैलिखीत प्रकरणांची नुसती शीर्षके जरी वाचलीत तरी हा कानमंत्र थेट कसा पोचणारा आहे हे लक्षात येईल. 'काल-बँक-लिमिटेड’मध्ये पै ह्यांनी सांगितलेली वेळेची बचत तर सर्वांनाच उपयुक्त. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा. असेच आहे हे सारे !