Connect The Dots ( कनेक्ट द डॉट्स)
'एमबीए'ची पदवी नसतानाही ज्यांनी आपला मार्ग तर शोधलाच, पण अनेकांना रोजगार देणारे मोठे उद्योग उभारले. एक एक बिंदू जोडत ज्यांनी मोठी झेप घेतली आहे अशा उद्योजकांची ही कहाणी. "स्टे हंग्री स्टे फुलिश' या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका व "जस्ट अनदर मॅगझीन' या युवाविषयक मासिकाच्या संपादिका रश्मी बन्सल यांचे हे पुस्तक. आरती कदम यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. पुण्यातील भारत विकास ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड यांच्यापासून "रेवा' या इलक्ट्रिक मोटारीचा निर्माता चेतन मायणी यांच्यासारख्या वेगळ्या उद्योजकांची कहाणी येथे आपल्यासमोर येते.