M T Aayava Maru (एम टी आयवा मारू)
एम टी-मोटर टॅंकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक. `मारू’ म्हणजे जहाज. `आयवा मारू’ या जपानी शब्दांचा अर्थ – प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज. `एम टी आयवा मारू’चे कथानक हॉंगकॉंगच्या किनार्यावर सुरू होते. चीनच्या किनार्यावर वेग घेते. फिलिपीन्सच्या किनार्यावर रंगू लागते... `एम टी आयवा मारू’ हा प्रेम-द्वेष, मत्सर-घृणा या भावभावनांचा जिवंत झंझावत आहे. पंचमहाभूतांचे जीवघेणे वादळ आहे. ही कादंबरी वाचताना एकच विचार सतत मनात येत राहीलः ही काल्पनिक कादंबरी आहे? की सत्य घटनांचे विवेचंन आहे? ही कादंबरी वाचताना जर सागराने आभाळात भिरकावलेली `आयवा मारू’ तुम्हांला स्वतःला दिसली असेल, जर लाटांचे तांडव तुम्ही स्वतः अनुभवले असेल, जर वार्याचे घोंघावमे तुम्हांला स्वतःला ऐकू आले असेल, जर `आयवा मारू’ ने तुम्हांलाही झपाटले असेल, तर ही `आयवा मारू’ केवळ कल्पित असणे शक्य आहे का?