Chanderi Swapne (चंदेरी स्वप्ने)

By (author) V.S.Khandekar Publisher Mehta Publishing House

साप, व्यभिचार व लढाई यांच्या गोष्टींना कधी अंत नसतो. मानवजात अजून रानटी आहे.... तुम्ही-आम्ही सारे अजून रानटी आहोत ! म्हणूनच असल्या लढाया होतात् ! नाही तर.... कडुलिंबाचं झाड फार जुनं झालं, म्हणजे त्याच्या लाकडाला चंदनाचा वास येतो, असं म्हणतात. जिला आपण सुधारणा सुधारणा म्हणतो, तो असलाच सुवास आहे. बुद्धीवर जगणार्‍याचं आयुष्य हे बाभळीच्या झाडासारखं आहे. जवळ येणार्‍याला त्याला सावली तर देता येतच नाही; उलट, त्याचे काटे मात्र केव्हा पायांत मोडतील, याचा नेम नसतो! प्रत्येक माणसाला तत्त्वज्ञानाचं सुंदर चित्र आवडतं ! पण त्याची लांबी-रुंदी स्वार्थाच्या चौकटीइतकीच असावी, अशीत्याची अपेक्षा असते !

Book Details

ADD TO BAG