Samrat Nepolian (सम्राट नेपोलियन)

By (author) Madhuri Kale Publisher Majestic Prakashan

"कॉर्सिका या छोट्या बेटावर जन्मलेल्या नेपोलियनचा केवळ आठव्या वर्षी वडिलांचं बोट धरून फ्रान्समध्ये प्रवेश. प्रथम ब्रीनी आणि नंतर इकोल मिलिटिएरमध्ये लष्करी शिक्षण. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बुर्बान राजा सोळावा लुई आणि मेरी आन्तवान यांना सुळी चढवल्यानंतर नव्या राज्यघटनेनुसार आणि स्वकर्तृत्वावर भराभर चढत जाऊन सम्राटपद पटकावलं… आणि ते वंशपरंपरागत टिकवण्यासाठी जोसेफाईनला घटस्फोट देऊन ऑस्ट्रियन राजकन्येशी विवाहबद्ध-पुत्रप्राप्ती. संपूर्ण युरोप एकछत्राखाली आणून शासन आणि कायद्याने एकजूट करायची या एका अत्यंत व्यापक आणि विधायक कल्पनेने प्रेरित. एक धडाडीचा योद्धा, कुशल प्रशासक आणि बलाढ्य सम्राट या नात्याने देदीप्यमान कामगिरी. केवळ 22 वर्षांत 60 लहानमोठे संग्राम. वॉटर्लूच्या युद्धात सपशेल हार. आयुष्याच्या उत्तरार्धात सेंट हेलेना इथं हद्दपारीची शिक्षा भोगत असताना तिथेच अकाली मृत्यू. उण्यापुर्‍या 52 वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण युरोपाला धारेवर धरणार्‍या या सम्राटाचा अंत संशयास्पद व्हावा हा केवळ दैवदुर्विलासच म्हणावा लागेल."

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category